मोदी सरकारचा निषेध | काँग्रेसची सायकल रॅली
राजुरा-
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. पेट्रोलने १०७ रुपये लिटर चा टप्पा पार केला असून डिझेल ९४ रुपये लिटर आहे. स्वयंपाकाचा गॅस च्या किमती ९०० च्या घरात पोहचल्या आहेत. अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सुध्दा गगनाला भिडल्या आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा काँग्रेस द्वारा आयोजित सायकल रॅली आंदोलनात केले.
भवानी मंदिर ते संविधान चौक आणि संविधान चौक ते तहसील कार्यालय राजुरा पर्यंत काढण्यात आलेल्या सायकल रॅली आणि जन आक्रोश आंदोलन आज दिनांक 14 जुलैला राजुरा येथे करण्यात आले होते या प्रसंगी आमदार सुभाष धोटे बोलत होते.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला सचिव नम्रता ठेमस्कर, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर,ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, जि प सदस्य मेघाताई नलगे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरणुले , प.स. सदस्य कुंदाताई जेणेकर, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, नगरसेवक हरजीत सिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, स न यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, महिला काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्या चांदेकर, नगरसेविका दिपा करमनकर, गीता रोहने, शारदा टिपले, साधना भाके, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, हरिचंद्र जुनघरी, शिवराम लांडे, सर्वानंद वाघमारे, अविनाश जेनेकर, सय्यद सकावत अली, संतोष इंदुरवार, चंद्रकात धोटे, रामभाऊ ढुमने, लहू चहारे, रामभाऊ देवईकर, कवडू सातपुते, श्यामभाऊ कोटनाके, जंगु पाटील मडावी, गजेंद्र ढवस, अमोल घटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, राजु पिंपळशेंडे, राजाराम येल्ला, पंढरी चंन्ने, विकास देवाडकर, इर्शाद शेख, धनराज चिंचोलकर, राजकुमार ठाकूर, प्रणय लांडे, शाहनवाज कुरेशी, आकाश मावलीकर, कोमल पुसाटे, जगदीश बुटले, संदीप घोटेकर, सय्यद साबीर, माजी सभापती निर्मला कुडमेथे, यासह राजुरा तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, किसान काँग्रेस, सेवादल काँग्रेस, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. रॅलीत शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक वर्ग तसेच सर्व स्तरातील सर्व सामान्य नागरिकांनी केंद्रातील मोदी सरकारचा जाहीर निषेध केला.