Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २५, २०२१

अनेक चढ-उतार, आव्हानांना सामोरे जात मीराताईनी गाठली कोटींची वार्षिक उलाढाल |

भारतात स्त्री ही कायम सक्षमच होती.... आहे!

आपलं आयुष्य कस घडवायचं आणि काय मिळवायचं ते आपल्याच हातात आहे.

जिद्द, मेहनत, सखोल अभ्यास, आत्मविश्वासाचा जिथे संगम होतो तिथे यश हमखास मिळतेच असे मत नागपूर च्या यशस्वी उद्योजिका इप्सिलॉन केबल्स प्रायव्हेट लिमिटेड MIDC, हिंगणा च्या संचालिका मा. मीराताई जोशी (Meera Joshi Owner, EPSILLON CABLES PVT. LTD) यांनी ग्रामायण उद्यमगाथा च्या विसाव्या भागात मांडले. याप्रसंगी श्री प्रशांत बुजोणे यांनी त्यांची एक उत्तम मुलाखत घेतली.

सेवाग्राम अभियांत्रिकी महाविद्यालयामधून Power Electronics मध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मीराताईंनी पुरुष प्रधान भासणार्‍या दोन मोठ्या औद्योगिक संस्थामध्ये कार्य करत आपल्या कारकीर्दीस सुरवात केली ज्यात त्यांनी अनेक आयमांतर्गत कार्य केले, ज्यात मुख्यत्वे त्यांचे विषय Flame Retardent Low Smoke Cable आणि All Aluminum Alloy Conductors हे असून कार्यक्षेत्र रिसर्च अँड डेव्हेलप्मेन्ट्, टेस्टिंग अँड डिझाईन, तसेच कॉस्टिंग ट्रेंडिंग आणि उत्पादन नियोजन यात देखील त्या कार्यरत होत्या. त्यातील एका संस्थेच्या वार्षिक उलाढालीत आमूलाग्र वाढ झाली. हा अनुभव त्यांना स्वतःची औद्योगिक संस्था स्थापन करताना, तसेच त्याचा विस्तार करताना बहुपयोगी ठरला.

सन १९९८ मध्ये त्यांनी स्वतःची औद्योगिक संस्था भागीदारी स्वरूपात सुरू केली. यात त्यांनी house-wires पासून सुरवात केली आज त्यांचे Special Cables Of Instrumentation आणि Control Cables हे Epsilon Cables नावे आद्योगिक क्षेत्रात सुप्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक चढ-उतार, आव्हानांना सामोरे जात आज त्यांची वार्षिक उलाढाल ७०० लाखांच्या वर आहे.

मा. मीराताई जोशी यांनी नवीन उद्योजक व उद्योजिकांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत काही मोलाचे सल्ले त्यांच्या अनुभवातून दिले. ज्यात नियोजन, स्पष्ट दृष्टिकोन, अभ्यासूवृत्ती, गुणवत्तापूर्ण उत्पादन, १:१ मालक-ग्राहक संपर्क याचा समावेश होता.

तसेच महिला उद्योजकांना त्यांनी घर आणि काम दोन्हीही सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे, हे मान्य करून त्याकडे आदरपूर्वक दृष्टीने बघत वाटचाल करावी, तसेच पाय कायम जमिनीवर रोवून ठेवावे. असा आपुलकीचा संदेश त्यांनी ग्रामायण उद्यमगाथा नागपूर च्या कार्यक्रमाद्वारे दिला.

मा. मीराताईं जोशी यांचे उद्बोधन उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर व मोलाचे आहे.

Meera Joshi

Owner, EPSILLON CABLES PVT. LTD

Greater Nagpur


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.