पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने २०० लोकांचे रोजगार पुन्हा सुरू होणार
चंद्रपूर : शहरात अनेक अनेक वर्षांपासून संडे मार्केट भरतो, पण दुसऱ्या लाटे मध्ये जो लॉक डाऊन लागला त्या मध्ये हे मार्केट पुन्हा बंद झालं. राज्यसरकारने अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली तरी अद्याप या संडे मार्केट वाल्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी नव्हती. संडे मार्केट च्या माध्यमातून २०० लोकांच्या रोजगाराचा प्रश्न प्रलंबित होता.
गुरुवारी या संडे मार्केट मधील महिला वायसायिकांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. आपल्या अडचणी सांगून रोजगार बंद झाल्याने सर्व व्यावसायिकांचे हाल होत आहे त्या मुळे बाकी दुकाने जसे सुरू असतात त्याच पद्धतीने संडे मार्केटला सुद्धा परवानगी द्यावी आम्ही सगळे नियम पाळून आपला व्यवसाय करू. आठवड्यातून केवळ एक दिवस रविवारी आमची दुकानं चालतात ते सुरू करून आम्हाला आमचा रोजगार परत द्या अशी विनंती सदर व्यावसायिक महिलांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना केली.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना फोन लावून संडे मार्केट व्यावसायिकांना दुकाने लावू द्या अशी सूचना करून तात्काळ संडे मार्केट व्यावसायिकांची समस्या निकाली काढली. या मुळे आता संडे मार्केट व्यावसायिकांचा दुकाने लावण्याचा मार्ग मोकळा झाला असून येणाऱ्या रविवारी संडे मार्केट भरणार आहे.
उपस्थित सर्व व्यावसायिकांनी या वेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानून या पुढे आम्ही देखील काँग्रेस पक्षा साठी काम करणार अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिली.संडे मार्केट मधील व्यावसायिक समिस्ता समारुद्दीन फारुकी यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना निवेदन दिले.
यावेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, उपाध्यक्षा सुनीता धोटे, सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, सदस्य लता बारापात्रे, समिस्ता समारुद्दीन फारुकी, मंजू भारती, किरण वानखेडे, कांचन रसाड, कविता मेश्राम, पल्लवी वानखेडे, संगीता बोरकर, रेणू सोनटक्के, सबिया पठान, मंजू झाडे यांची उपस्थिती होती.