Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ३०, २०२१

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

 


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)इयत्ता बारावीचा निकाल शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. http://cbseresults.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत.


सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे.

How To Check CBSE 12th Results

  • निकाल पाहण्यासाठी CBSE https://cbseresults.nic.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा
  • वेबसाइटवर दिलेल्या बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर टाका
  • आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
  • आपण भविष्यातील माहिती किंवा इतर कार्यासाठी परिणाम प्रिंट आउट देखील करू शकता

  • निकालाची वेबसाईट

    https://cbseresults.nic.in/ या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत लिंकवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहू शकणार आहेत.

    दरम्यान, तत्पूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने दहावी आणि बारावीचे रोल नंबर जाहीर केले आहेत. बोर्डाने (सीबीएसई) दहावी रोल नंबर २९ जुलैपासून अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ दरम्यान दहावी आणि बारावीचे विद्यार्थी विद्यार्थीनी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देणयात आलेल्या लिंकवरुन आपले रोल नंबर तपासू शकतात.


    सीबीएसई रिझल्ट २०२१ हा अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची गरज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीचे रोल नंबर पाहण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला आहे.







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.