राजू कुकडे वर कार्यवाही करा : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची जिल्हाधिकारी कडे मागणी
चंद्रपूर / प्रतिनिधी
मूल तहसिल चे कर्त्यव्य दक्ष तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांच्या विरोधात बातमी प्रकाशित केल्याप्रकरणी भूमिपुत्रा ची हाक या न्युज पोर्टल संपादक वरोरा येथील रहिवासी राजू कुकडे यांचेवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करा अशी मागणी जिल्हाधिकारी अजय गुलाने यांचे कडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे.
राजू कुकडे हे एका कर्तव्य दक्ष तहसीलदाराला बदनाम करून रेती तस्करीला साथ देणे, रेतीमाफियकडून पैसे घेणे असे आरोप भूमिपुत्रा ची हाक या न्युज पोर्टल वर केली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव महिपाल मडावी यांनी राजू कुकडे यांचेवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी केली आहे.
निवेदन अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखडेकर यांनी स्वीकारले असून, राजू कुकडे यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम, विदर्भ सचिव महिपाल मडावी, जिल्हाध्यक्ष प्रदीप गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष नितीन सिळाम उपस्थित होते.