शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: भद्रावती डोलारा तलाव येथे राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडीतीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अशोक न तथ्थुजी वनकर वय ६० वर्ष राहणार डोलारा तलाव भद्रावती असे आरोपीचे नाव आहे. आठ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी ही आपल्या आजीकडे दीड महिन्यापूर्वी आली होती तेव्हा ती शेजारी खुल्या जागेवरील झुल्यावर बसली असता आरोपीने चल तुला माझे घर दाखवितो असे म्हणत तिला घरी नेले व तिच्यावर अत्याचार केला. या बाबद कोनाला सांगशील तर तुला व तुझ्या आई वडिलांना जिवानिशी ठार मारील असा दम दिला होता. त्यामुळे या पीडित मुलीने ही घटना घरच्यांपासून दीड महिना लपवून ठेवली तिची प्रकृती वारंवार बिघडत असल्याचे पाहून तिच्या आजीने व आत्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता ही संपूर्ण घटना तिने सांगितली. या घटनेची तक्रार रविवारला पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी आरोपीला अटक केली.