वायुनंदन पॉवरप्लांटच्या दुषित वायुमुळे नागरिकांच्या आरोग्याचे व शेतीच्या पिकाला नुकसान तसेच वैनगंगा नदीचे पाणी दुषित - अविनाश पाल
सावली- जनता एकीकडे कोरोना या महामारी रोगाने त्रस्त आहे व दुसरीकडे वायुनंदन पॉवरप्लांट कंपनीच्या चिमणीतून मोठ्या प्रमानात विषारी काळा धूर निघत असून परिसरातील वातावरण दुषित होत आहे. या निघणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरातील अनेक गाव जसे की कनेरी ता. जि. गडचिरोली वाघुलीबुट्टी, सामदा बूज, व्याहाड बूज ता.सावली जि.चंद्रपूर येथील नागरिकांना व नदीकाठी असलेल्या शेतीला व शेतातील पिकांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चंद्रपूर-गडचिरोली हायवे रस्त्याने जाणाऱ्या प्रवाश्यांना सुद्धा याचा खूप त्रास होतो. पॉवरप्लांटमधून निघणारे दुषित पाणी हे नदी पात्रात सोडल्यामुळे वैनगंगा नदीचे पाणी व त्यात असणाऱ्या जलचरांना याचा नुकसान होत आहे. सदर नदीचे पाणी हे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी वापरत असतात. आधीच कोरोनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून आता दुषित पाणी पिल्याने आणखी जीवघेणे आजार नागरिकांना होत आहेत. या संदर्भात श्री अविनाश पाल यांनी मा.उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य चंद्रपूर व मा. प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना याबाबत कळविलेले आहे परंतु अजूनहि कंपनी व्यवस्थापनवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही व याप्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. भविष्यात होणाऱ्या परिणामास कंपनी व उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य चंद्रपूर तसेच प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर हे सर्वस्वी जबाबदार राहतील. असे अविनाश पाल भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर यांनी मा. जिल्हाधिकारी साहेबाना सांगितले.