अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत असलेले बफर क्षेत्रातील तुकुम गाव...
शंकरपूर... मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गाव तिथे रस्ता हे अभियान राबवले जात आहे अतिदुर्गम भागात पक्के रस्ते तयार झाले असले तरी स्वातंत्र्यानंतरही पक्या रस्त्यासाठी वाट पाहत असलेले अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत बफर झोन मध्ये येणाऱ्या तुकूम गावातील खडतर रस्ता पक्क्या रस्त्याची आजही वाट पाहत आहे..
या गावात 12 घरी असून 48 नागरिक राहत आहे त्यांना आरोग्य शिक्षण व दळणवळणाच्या साधनांतसाठी पक्क्या रस्त्यांची आवश्यकता असून आज पर्यंत लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे मुलांना आजही पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाकरीता दोन किलोमीटर अंतर पायीच जावे लागते तर पुढील शिक्षणाकरिता तसेच तालुक्याच्या ठिकाणी 25 किलोमीटर अंतर येत असुन पावसाळ्यामध्ये होणारा त्रास त्यांना सहन करावा लागतो, गावातील एखाद्या नागरिकाची तब्येत रात्रीच्या सुमारास बिघडल्यास दहा किलोमीटर अंतर दवाखान्याचे येत असून रात्रीच्या सुमारास खूप मोठा त्रास सहन करावा लागतो,शेती हंगाम सुरू झाला असून पावसाळ्याची सुरुवात झाली शेतकऱ्यांना खते, बियाणे शेती उपयोगी इतर साहित्य घेण्याकरता शेतकऱ्यांना खडतर रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागतो या क्षेत्राला लाभलेले पती-पत्नी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन पक्का रस्ता बनवून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे...