Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २०, २०२१

आजपासून ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण

ऑनलाईन नोंदणी अनिवार्य : ८१ केन्द्रांवर सुविधा


नागपूर, ता.१८ : राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार ३० वर्ष ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण शनिवार (१९ जून) पासून नागपूर महानगरपालिकेच्या ८१ केन्द्रावर सुरु होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हीशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. प्रत्येक केन्द्रांवर १०० नागरिकांना लस दिली जाईल, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, या केन्द्रांवर सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत लसीकरण केल्या जाईल. यासाठी covinapp वर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्राथमिक स्वरुपात ८१ केन्द्रांवर ही सोय करण्यात आली आहे. नंतर लसीचा पुरवठा उपलब्धतेनुसार केन्द्रांची संख्या वाढवली जाईल. यासोबतच २३ केन्द्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु राहील.

महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ३० वर्ष ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांनी या व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

तसेच ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दूसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे नागरिकांसाठी उपलब्ध आहे. ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीन चा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तसेच राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दूसरा डोज दिला जात आहे. कोव्हीशिल्ड लस सर्व केंद्रांवर उपलब्ध आहे.

केन्द्र शासनाच्या नविन निर्देशानूसार ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्या पुर्वी घेतला आहे त्यांना दूसरा डोज़ दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर यांना सुद्धा दूसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांचे लसिकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.