चंद्रपूर : शहर महानगरपालिका, चंद्रपूर (आरोग्य विभाग)च्या वतीने सोमवार, दि. २१ जून २०२१ रोजी ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. त्यासाठी १६ लसीकरण केंद्र नियोजित करण्यात आले आहेत.
३० ते ४४ वयोगटातील तसेच ४५ वर्षावरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड) १. शहरी नागरी आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड, २. कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकार नगर, ३. पोद्दार स्कूल, अष्टभुजा वॉर्ड, ४. गजानन मंदिर, वडगांव, ५. शकुंतला लॉन १, नागपूर रोड, ६. टागोर प्राथमिक शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड, ७. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड, ८. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानपेठ वॉर्ड, ९. सावित्रीबाई फुले शाळा, नेताजी चौक, १०. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबूपेठ, ११. मुरलीधर बागला शाळा, बाबूपेठ, १२. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली मंदिर रोड, १३. लोकमान्य टिळक शाळा, समाधी वॉर्ड, १४. मातोश्री शाळा, तुकुम, १५. विद्या विहार शाळा, लॉ कॉलेज जवळ, १६. जलाराम मंदिर, एस.पी. कॉलेज जवळ आदी केंद्र आहेत. तर केवळ ४५ वर्षावरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सीन) १. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर २. शासकीय आयटीआय कॉलेज, वरोरा नाका, नागपूर रोड येथे राहील.
वरील सर्व केंद्रावर ऑनलाईन आणि ऑफलाईन (टोकन) पद्धतीने लसीकरण होईल. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसानंतर घ्यावा. दुसऱ्या डोससाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील. विनाकारण गर्दी करू नये. 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.