शंकरपूर... ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत बफर झोन मध्ये येणाऱ्या अर्जुनी तुकुम गावातील वीजपुरवठा मागील सहा महिन्यापासून दिवसा-रात्रीच्या वेळी बंद करण्याचा खेळ वीज पुरवठा कार्यालय शेगाव कडुन सुरू असल्यामुळे जनतेला या समस्येचा सामना करावा लागत आहे...
उपविभागीय कार्यालय वरोरा व उपकेंद्र शेगाव (बु) अंतर्गत अर्जुनी तुकूम दोन हजार लोकसंख्या असलेलं हे गाव येत असून जवळच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या ठिकाणी वाघ,अस्वल, बिबट, हरिण,जंगली डुकर ईतर प्राणी मोठ्या प्रमाणात वावर असते गावातील शेतकऱ्यांनी शेती कामाला सुरुवात केली असून शेतकर्यांना शेती कामासाठी शेतावर जावे लागत असून रात्रीला निघणाऱ्या सरपटणारे प्राणी, तसेच गावा लगत येणाऱ्या वन्य प्राण्यांमुळे मोठी घटना होण्याची भीती नागरिकांमध्ये फसलेली आहे कोणतेही कारण नसताना दिवसांत रात्रीच्या सुमारास मागील सहा महिन्यापासून वारंवार विद्युत् पुरवठा बंद होत असल्यामुळे नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. पाऊस, वादळ,व कोणती कारण नसताना विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम उपविभागीय कार्यालय शेगाव (बु) कडून केले जात आहे रात्रीच्या सुमारास हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात कोणती दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून याकडे लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी अर्जुनी तुकूम बफर झोन गावातील जनता करीत आहे..