Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०३, २०२१

माजी नगराध्यक्ष रमेशभाऊ कोतपल्लीवार यांचे निधन

चंद्रपूर(खबरबात):
 चंद्रपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा मंदिराचे विश्वस्त रमेश भाऊ कोतपल्लीवार यांचे 3 जून रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले ते 80 वर्षांचे होते.
महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे ते नेते होते. मविसचा प्रभाव चंद्रपुरात वाढला होता. रमेशभाऊ नगरसेवक पदाचे उमेदवार होते. रमेशभाऊ भानापेठ वार्डातून निवडून आले आणि चंद्रपुर नगरपरिषदेचे अध्यक्ष बनले. त्यांनी नगरपरिषदेच्या कारभार उत्तमरीतीने चालविला. कमलनाथ केंद्रीय कोळसा मंत्री होते, तेव्हा  वेस्टर्न कोल्ड फिल्डचे मुख्यालय नागपूरातून जबलपूरला हलविण्याचा निर्णय कोळसा मंत्रालयाने घेतला. भंडाऱ्याचे फाॅरर्वड ब्लाॅकचे नेते आणि चंद्रपूरचे महाविदर्भ संघर्ष समितीचे निवडून आलेले नगराध्यक्ष रमेश कोतपल्लीवार रामनगरमधील शासकीय विश्रामगृहात भाऊ जांबुवंतरावांना भेटले. वस्तुस्थिती सांगीतली. थेट भाऊंनी इंदिराजींना लाईटिंग काॅल लावून भेटीची वेळ व तारीख मागीतली होती.
ते नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळले. आणि या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद भुषविले. परंतु, राजकारणातील बेबंदशाही रमेशभाऊला कधी पसंद आली नाही आणि भ्रष्टाचार कधी सहन झाला नाही. रमेशभाऊनी राजकारणाशी फारकत घेतली आणि आता साईबाबा मंदिरात आपली भक्ती अर्पित केली. नुकताच 27 एप्रिल रोजी 80वा वाढदिवस साजरा केला.  

देशभरात कोरोनाचे संकट बघता आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने केंद्र सरकारसह राज्य सरकारने मदतीचे आवाहन केले. यात श्री. रमेश एम. कोतपल्लीवार यांनी ५१ हजार रू.चा धनादेश मदत निधीकरीता दिला. मागील आठवडाभरापासून ते आजारी होते. अल्पशा आजाराने आज तीन जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.