Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०४, २०२१

जुन्नर येथे शिवसंस्कारसृष्टी होणार



जुन्नर /आनंद कांबळे

शिवजन्मभूमी म्हणून अोळखल्या जाणाऱ्या आपल्या जुन्नर तालुक्यातील 'शिवसंस्कार सृष्टी'साठी जलसंपदा विभागाची जागा देण्यास राज्याचे जलसंपदामंत्री मा. जयंत पाटील साहेबांनी तत्वतः मान्यता दिली असून रीतसर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो.

यानिर्णयामुळे 'शिवसंस्कार सृष्टी' साकारण्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात 'शिवसंस्कार सृष्टी' उभी राहावी यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांनी जागा दिल्यास निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या मालकीची जागा सुचवली होती. त्यानुसार पत्रव्यवहार सुरू होता. त्यानुसार जागा मागणीसाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समवेत बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु कोविड संकटामुळे बैठक होऊ वेळोवेळी लांबणीवर पडत होती.

या संदर्भात जलसंपदामंत्री पाटील यांना पत्र पाठवून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार काल (गुरूवार दि.३ जून) मंत्रालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला माझ्यासमवेत आमदार अतुल बेनके, जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, पर्यटन सचिव व्हल्सा नायर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

या बैठकीत 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाच्या सादरीकरण पाहून प्रभावित झालेल्या जलसंपदामंत्री पाटील यांनी 'शिवसंस्कार सृष्टी' संकल्पनेचे कौतुक केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत साकारण्यात येणाऱ्या 'शिवसंस्कार सृष्टी'साठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. तसेच याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या निर्देश संबंधितांना दिले.

आपला जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला आहे. परंतु पर्यटन वाढीच्या दृष्टीने म्हणावे तसे प्रयत्न झाले नव्हते. या 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्पामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार असून त्यातून तालुक्यात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने आपण हा प्रकल्प लवकरात लवकर तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रकल्प मोठा असून जुन्नरच्या लौकिकात भर घालणारा असल्याने उभारणीसाठीच्या आवश्यक बाबींची जुळवाजुळव करणे यासाठी आमदार बेनके व आपण समन्वयाने पाठपुरावा करणार आहोत, असा विश्वास व्यक्त करतो.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.