Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून १०, २०२१

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध ठिकाणी पावसात आंदोलन

 नागपुर-  पोषण टँकर एप्सला आयटकचा विरोध 




केंद्र  सरकारने  पोषण टँकर एँप्स मराठीत करा अन्यथा  एँप्सचे कामबंद मागणीला घेवून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आवाहनानुसार  आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने  १० जून २०२१ रोजी नागपुर तालुक्यात  विविध ठिकाणी भर पावसात संघटनेचे राज्य  सरचिटणीस काँ श्यामजी काळे यांच्या मार्गदर्शनात    कोरोणा प्रादुर्भाव लक्षात  घेता सर्व नियम पाळून  अंगणवाडी  कर्मचाऱ्यांनी  आंदोलन केले. जिल्ह्यात १० ते २१ जून या कालावधीत विविध तालुक्यात आंदोलन होणार असून हा पहिला दिवस होता.

अंगणवाड्यांच्या कामकाजाची माहिती शासनाला दैनंदिन पातळीवर कळविण्यासाठी, मे २०२० पर्यंत कॅस या ऍप्स मध्ये ती माहिती भरली जात होती. परंतु मे २०२० पासून कॅसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ते बंद पडले व माहिती पुन्हा रजिस्टर्समध्ये माहिती भरण्याचे आदेश आले. काही कर्मचाऱ्यांकडील जुनी रजिस्टर्स संपलेली असल्यामुळे त्यांना स्वखर्चाने नवीन रजिस्टर्स घेणे भाग पडले. या सर्व अडचणींना तोंड देत असतानाच पोषण ट्रॅकर या केंद्र शासनाच्या नवीन ऍपवर काम करण्याचा आदेश आला. परंतु त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. 


अनेक कर्मचाऱ्यांचा शासनाने दिलेला मोबाईल नादुरुस्त आहे व त्यात हा ऍप डाऊनलोड होत नाही त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाईलवर ऍप डाऊनलोड करायला सांगितले जात आहे. अनेक जणींकडे स्वतःचा चांगला स्मार्ट फोन नाही. काहींकडे असल्यास तो त्या एकट्या वापरत नाहीत तर त्यांच्या घरातील कुटुंबीय सामायिक रित्या वापरतात. अनेकांच्या पाल्यांचे त्यावर ऑनलाईन वर्ग किंवा परिक्षा चालू असतात. त्यामुळे त्यांना तो हवा तेव्हा उपलब्ध होईलच याची खात्री देता येत नाही. शिवाय डेटा रिचार्जचे पैसे महिनोन महिने येत नाहीत. त्यामुळे पोषण ट्रॅकरसाठी खाजगी फोन वापरला जाऊ नये. शासनाने त्यांना चांगल्या क्षमतेचा नवीन मोबाईल द्यावा. तसेच डेटा रिचार्जसाठीचे पैसे नियमितपणे द्यावेत अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.  


महाराष्ट्रात सर्व शासकीय व्यवहार मराठीत व्हावेत असा आदेश आहे त्यानुसार पोषण ट्रॅकरमध्ये देखील सर्व माहिती मराठीत भरली गेली पाहिजे. परंतु पोषण ट्रॅकर ऍपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही. इंग्रजीमध्येच सर्व माहिती भरावी लागते. बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी, विशेषतः ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील सेविका, मिनी अंगणवाडी सेविका कमी शिकलेल्या आहेत व त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरता येत नाही. काही ठिकाणी सेविकेची जागा रिक्त असल्याने मदतनीसांना ही जबाबदारी दिली आहे. त्यांना इंग्रजी येत नाही.

 

लाभार्थी बालकांचा आधार कार्ड क्रमांक जोडल्याशिवाय व सर्व माहिती इंग्रजीत भरल्याशिवाय त्यांना पूरक पोषण आहाराचा लाभ मिळून शकणार नाही अशी जाचक अट पोषण ट्रॅकरमध्ये घालण्यात आलेली आहे. आधार कार्ड नसले तरीही कुणालाही सामाजिक सुरक्षा व अन्न अधिकारापासून वंचित ठेवण्यास प्रतिबंधित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तसेच मानवी हक्कांचे हे उल्लंघन आहे. 


अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा खूपच चुकीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही ऍपमध्ये भरलेली माहिती सिंक होत नाही. कधी रेंज न मिळाल्याने इंटरनेट चालू नसते किंवा त्याची क्षमता कमी असते त्यामुळे माहिती अपलोड होत नाही, तर कधी सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे काम करूनही केवळ पोषण ट्रॅकमध्ये माहिती गेली नाही म्हणून मानधनात कपात करणे अन्यायकारक आहे. 

सेविकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या अंगणवाडीतील मदतनीस ऑनलाईन काम करण्यास सक्षम नसल्यास जवळच्या अंगणवाडी सेविकेला त्या अंगणवाडीचा अतिरिक्त कार्यभार दिला जातो. कमी वेळामध्ये अशा अतिरिक्त अंगणवाडीची जबाबदारी पार पाडणे, म्हणजेच दुप्पट काम करणे केवळ अशक्य आहे.

वरील सर्व अडचणी न सोडवता केवळ केंद्र शासनाने दिले आहे म्हणून ते काम कोणताही साधक बाधक विचार न करता तसेच्या तसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादणे अन्यायकारक आहे.  आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने १९ मार्चच्या निवेदनात सर्व अडचणी नमूद करूनही शासनाने त्या सोडविण्यासाठी काहीही कृती केली नाही उलट परिक्षेत किंवा ऑनलाईन अभ्यासात गुंतलेल्या पाल्यांना त्यांचे महत्वाचे शैक्षणिक काम सोडायला लावून त्यांच्याकडून किंवा शेजार, पाजारच्या लोकांकडून किंवा सायबर कॅफेमध्ये पैसे देऊन हे काम करून घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. काही जणींनी अशा पद्धतीने काम करवून देखील घेतले. परंतु काही जणींना ते देखील शक्य झालेले नाही. या परिस्थितीत त्यांना एप्रिलचे मानधन न देण्याची व लाभार्थ्यांना आहार न देण्याची धमकी प्रशासनाकडून दिली जात आहे. पोषण ट्रॅकर बाबतच्या सर्व अडचणी सुटेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी बाकीची सर्व कर्तव्ये पार पाडतील परंतु पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्याचे काम करणार नाहीत तसेच ५ ते ९ एप्रिल २०२१ या आठवड्यात राज्यातील सर्व प्रकल्पांवर तसेच जिल्हा परिषदांवर आंदोलन करून निवेदन देतील असे कृती समितीने जाहीर केले असून शासनाने वर नमूद केलेल्या तसेच नंतर उद्भवू शकणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा निर्णय मागे घ्यावा असे शासनाला कळविण्यात आले  आहे.

मागण्यांचे निवेदन कळमेश्वर व हिंगणा बालविकास प्रकल्प अधिकारी  ग्रामीण   यांना देण्यात आले  आजच्या आंदोलनात आशा बौदलखंडे .करुणा साखरे.वषाँ मानकर अचँना रुसेसरी.कल्पना शेवाळे.लता भड.दुगाँ धोंगडी.जयश्री चंहादे इत्यादी शेकडो कमँचारी उपस्थित हौत्या.

श्यामजी काळे आयटक


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.