रविवारपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरीकांसाठी प्रायोगिक तत्वावर लसीकरण
नोंदणी केलेल्या नागरिकांनाच मिळणार लस
चंद्रपूर, ता. १ : 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा मागील महिन्यात केंद्र सरकारने केली. त्यानुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान राबविण्याची तयारी सुरू आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत रविवार दिनांक 2 मे 2021 पासून प्रायोगिक तत्वावर दोन केंद्रावर 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
शहरातील रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर, आणि पंजाबी सेवा समिती, तुकुम या दोन केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. दर दिवशी २०० याप्रमाणे प्रत्येक केंद्रावर लसीकरण करण्यात येईल.
उपरोक्त लसीकरण केंद्रावर केवळ नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांनाच लस देण्यात येईल. तसेच केंद्रावर नोंदणी होणार नसल्याने केवळ नोंदणी केलेल्या नागरिकांनीच निश्चित केलेल्या दिवशी व वेळेत उपस्थित रहावे. त्यामुळे इतर नागरिकांनी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सूचना
- - कोविन अॅपवर नोंद केल्यानंतर जवळच्या १८ ते ४४ वर्षासाठी राखीव असलेल्या लसीकरण केंद्रावरच लस दिल्या जाईल.
- - सर्व केंद्रावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असल्याने नागरीकांनी गर्दी करु नये.
- -ज्या नागरीकांना लसीकरण सत्र उपलब्ध झाले आहे त्याच नागरीकांनी लसीकरणासाठी यावे.
- - सदर केंद्रावर स्पॉट रजिस्ट्रेशन ची सोय नसल्याने केंद्रावर जावून गर्दी करु नये.
- - १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्र राखीव असल्याने इतर वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरणासाठी आग्रह करु नये.
- संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असल्याने केंद्रावर विनाकारण गर्दी न करता लसीकरण करणाऱ्या टिमला सहकार्य करावे.
- - सदर राखीव लसीकरण केंद्रावर ४५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरीकांना लस दिल्या जाणार नसल्याने या वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरणाचा आग्रह धरु नये.