भानापेठ प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट,
मास्क, सॅनिटायझरचे वाटप
मास्क, सॅनिटायझरचे वाटप
चंद्रपूर, ता. ३० : केंद्रातील भारतीय जनता पक्षाने ७ वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केले. यानिमित्त सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात लढा देणाऱ्या घंटागाडीवरील स्वच्छतादूतांना रेनकोट, N-95 मास्क आणि सॅनिटायझरचे रविवारी (ता. ३०) वाटप करण्यात आले. भानापेठ वॉर्ड क्र. ११चे नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत अच्छे दिनची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रात सत्ता स्थापन केली. या सात वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या समस्या, आरोग्य व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच विविध विकासकामे करण्यावर भर दिला. मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजविला तरी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धस्तरावर उपाययोजना केल्या. केंद्रातील भारतीय जनता पक्षाने सात वर्षे पूर्ण केले. त्यानिमित्ताने सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. भानापेठ वॉर्ड क्र. ११चे नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या नेतृत्त्वात प्रभागातील नगरसेवक राजेंद्र अडपेवार, नगरसेविका आशा आबोजवार, नगरसेविका शितल कुळमेथे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील विविध ३५ घंटागाडीवरील स्वच्छतादूतांना रेनकोट, N-95 मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी यावेळी डॉ. पालीवाल, बाळा कोलनकर, सचिन कोतपल्लीवार, प्रवीण नामशेट्टीवार, नाना श्रीरामवार, केतन मेहता, मयूर चंद्रावार, भावेश जैश, जितू शर्मा, प्रवीण उरकुडे, भावना किरमिटवार, अमन वाघ, मनोज गुजराथी, राकेश परिहार, भुपेश गोठे, कृष्णा चांदावार तसेच भाजपाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.