Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०४, २०२१

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्‍या सहकार्याने 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध

 केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्‍या सहकार्याने 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध


आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले नितीन गडकरी यांचे आभार


आणखी 150 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध होणार – आ. सुधीर मुनगंटीवार



केंद्रीय भुतल परिवहनमंत्री तथा ज्‍येष्‍ठ भाजपा नेते नितीनजी गडकरी यांच्‍या सहकार्याने बल्‍लारपूर, मुल , पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रूग्‍णालयांसाठी 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटरचे वितरण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.


बल्‍लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रूग्‍णालयांसाठी सदर 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर दिनांक 4 मे रोजी वितरीत करण्‍यात आले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या विनंतीच्‍या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध करून दिले आहे. या आधी आमच्‍या विनंतीला मान देत चंद्रपूर जिल्‍हयातील जनतेच्‍या आरोग्‍य सुविधेच्‍या द़ष्‍टीने ना. नितीनजी गडकरी यांनी 15 एनआयव्‍ही, 2 मिनी व्‍हेंटीलेटर आणि 15 मोठे व्‍हेंटीलेटर जिल्‍हा रूग्‍णालयाला उपलब्‍ध करून दिले आहेत. नितीनजी गडकरी यांचे चंद्रपूर जिल्‍हयावर विशेष प्रेम आहे. या जिल्‍हयाच्‍या विकासासाठी केंद्रीय मार्ग निधीच्‍या माध्‍यमातुन वेळोवेळी भरघोस निधी त्‍यांनी मंजुर केला आहे. या संकटसमयी देखील त्‍यांनी आपल्‍या सहकार्याचा हात चंद्रपूर जिल्‍हयातील जनतेला दिला आहे. लवकरच आणखी 150 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध होणार असल्‍याचे सांगत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नितीनजी गडकरी यांचे आभार मानले.

यावेळी पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अल्‍का आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, मुल नगरपरिषदेचे उपाध्‍यक्ष नंदु रणदिवे, निलेश खरबडे, समिर केने, मनिष पांडे, सुभाष कासनगोट्टुवार, किशोर कापगते, प्रशांत समर्थ, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.