Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १३, २०२१

राज्यात बुधवारपासून १५ दिवस संचारबंदी- मुख्यमंत्री



अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य सेवा बंद, लोकल, बस सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार - मुख्यमंत्री

निवासी आणि प्रवासाची सोय असेल तर बांधकाम सुरू ठेवता येणार - मुख्यमंत्री

बँक, शेअर बाजार, पेट्रोल पंप, औषध दुकान, दवाखाने सुरू राहणार - मुख्यमंत्री



उद्या संध्याकाळी आठ वाजल्यापासून आपल्या राज्यात निर्बंध लागू होतील. पुढील १५ दिवस संचारबंदी असेल. घराबाहेर निघायचं नाही. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, इतर सेवा बंद राहतील. सकाळी सात ते रात्री 8 सकाळी या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, त्या चालू ठेवणार आहोत. एक गोष्ट मी मुद्दामून सांगतोय की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही. लोकल बंद राहणार नाही, बस सेवा बंद करत नाही. मात्र त्या केवळ आणि केवळ आवश्यक अतिआवश्यक कामासाठी वापरले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्याची मागणी आज पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा आलेख हा वाढता आहे.#महाराष्ट्रात दररोज सरासरी ६० हजाराच्या आसपास कोरोना रूग्न सापडत आहेत आणि त्या करिता महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत त्याच बरोबर पुढील एक ते दोन दिवसात आणखी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. राज्यातील गरीब आणि सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच हे कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महाराष्ट्राला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज आहे.मागच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने केंद्राची ही योजना यशस्वीपणे राबविली आहे.










SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.