शासकीय महाविद्यालयात पाच तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार
फिजिओ थेरेपी द्वारे कोरोना रुग्णांवर उपचार करावयाच्या व्हिडीओ तयार करा
चंद्रपूर : मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे. परंतु तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हे बेड्स कार्यान्वित करण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलून पाच तज्ज्ञ डॉक्टर आता वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देण्यास तयार आहे. त्यामुळे महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक रुग्णांना देणे सोईचे होणार आहे.
त्यासोबतच या विषाणूच्या प्रादुर्भावा पासून उपचार करताना फिजिओ थेरेपी वरदान ठरत आहे. त्याचा देखील उपचार दरम्यान वापर करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या. त्यामध्ये कोरोना पासून बरे झालेले व उपचार घेत असलेल्या रुग्णांना कशा प्रकारे फिजिओ थेरेपीचा वापर करावा, याबाबतचे व्हिडीओ तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मदतीने तयार करून दोन दिवसात समाज माध्यमांतून सर्वाना पाठवावे. त्याचप्रमाणे जे उपचार घेत असलेल्या रुग्णांना हे व्यायाम किंवा थेरेपी करून घेण्यात याव्या. असा लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.
आज खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत नरखेडकर, उपविभागीय अधिकारी घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक राठोड, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, बसंत सिग यांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खासगी तसेच शासकीय रुग्णालयात बेड्सचा अतिशय तुटवडा आहे. महिला रुग्णालयात २०० च्या वर बेड्स काही दिवसातच रुग्णांच्या सेवेत दाखल होऊ शकते. परंतु डॉक्टर व इतर कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे हे शक्य होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याची दिसून येते. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी यात तोडगा काढण्याकरिता तज्ज्ञ डॉक्टर बोलून त्यांना सेवा देण्यासाठी विनंती केली. त्यांनी देखील खासदार धानोरकर यांच्या विनंतीनुसार सेवा देण्यास तयारी दर्शविली. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना या पाच डॉक्टरांना सेवेत सामावून घेण्याच्या सूचना दिल्या. हे डॉक्टर सेवेत दाखल झाल्यानंतर अधिक पाच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. त्यामुळे आता २०० बेड्स लवकरच रुग्णांच्या सेवेकरिता तयार असणार आहे.