Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २६, २०२१

अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळयाचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला...विजय वडेटटीवार

 अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळयाचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला...विजय वडेटटीवार



     अजात शत्रु, अत्यंत लोकप्रिय जीवन जगणारे, सुस्वभावी, गेल्या अनेक दशकापासून माझे सहकारी असलेले, जिव्हाळयाचे मित्र संजय देवतळे निधनाची वार्ता एकटाच अतीव दु:ख झाले. ही न भरुन निघणारी हानी आहे अशी शोकभावना चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेटटीवार यांनी वक्त  केली. संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक असून  या बातमीवर विश्वासच बसत नाही. असेही त्यांनी प्रतिक्रिया देतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.

        माजी मंत्री दादासाहेब देवतळे नंतर त्यांनी चंद्रपूर जिल्हयाची काँग्रेस पक्षाची धुरा आपल्या खांदयावर घेऊन यशस्वीपणे पुढे नेली, चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे विस वर्ष आमदार होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी दिर्घकाळ जनतेची सेवा केली. राज्यात काँगेस पक्षाची सरकार असतांना ते राज्याचे सांस्कृतीक व पर्यावरण मंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून यशस्वीपणे काम करुन या जिल्हयाच्या विकासात बहुमोल हातभार लावला.  अतिशय शांत, लोकप्रिय नेता व अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. चंद्रपूर जिल्हयाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे. त्यांचे असे जाने जिल्हयातील न भरुन निघणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो व त्यांच्या परिवाराला हा मोठा आघात सहन करण्याची ताकद देवो अशी प्रतिक्रिया विजय वडेटटीवार यांनी दिली. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.