Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०६, २०२१

नागपुर शहराच्या ८४ शासकीय केन्द्रांमध्ये आता लसीकरणाची व्यवस्था :झोननिहाय लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे



नागपूरात लसीकरण मोहिमेला गती प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे दवाखाने, रुग्णालय व शासकीय रुग्णालय मिळून तब्बल ८४ केन्द्रांवर नि:शुल्क लसीकरण केल्या जात आहे. या सर्व केन्द्रांवर ४५ वर्षे वय व त्यावरील वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जात आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केल्या जाईल. काही केन्द्रांमध्ये रात्री १० वाजेपर्यंत सुध्दा लस दिली जाईल.

            महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पात्र वर्गातील सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाची तीव्रता कमी होते. त्यांनी सांगितले की ८ एप्रिल पासून विशेष मोहिम, विशेष वर्गाकरीता राबविली जात आहे. ही मोहिम ४५ वर्षे वयोगटातील व त्यावरील नागरिकांसाठी आहे. या मोहिमेसोबत सामान्य नागरिकांना सुध्दा याच केन्द्रांमध्ये लस दिली जाणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले.

 

आज सर्व चालकांचे लसीकरण

            मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांचे निर्देशानुसार ४५ वर्षे वरील वयोगटातील ऑटो रिक्शा चालक, सायकल रिक्शा चालक, ई-रिक्शा चालक, काली-पीली टॅक्सी चालक, ओला-उबेर टॅक्सी चालक व खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये काम करणा-या नागरिकांचे ८ एप्रिल ला सर्व शासकीय केन्द्रांमध्ये लसीकरण केल्या जाईल. या मोहिमेसोबत सामान्य नागरिकांना सुध्दा याच केन्द्रांमध्ये लस दिली जाईल. लसीकरणासाठी येणा-या नागरिकांनी आपल्यासोबत आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेंस, पासपोर्ट इत्यादी शासकीय परिचय पत्र सोबत ठेवावे. टायगर ऑटो रिक्शा संघटनेचे मार्गदर्शक श्री. विलास भालेकर यांनी नागपूर शहरातील सर्व ऑटो रिक्शा चालकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे




झोननिहाय लसीकरण केंद्र

लक्ष्मीनगर झोन

१.     श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतीक भवनराजीव नगर, प्रभाग क्र.३६

२.     क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, विवेकानंद नगर, प्रभाग क्र. १६

३.     समाज भवनगजानन नगर, प्रभाग क्र. १६

४.     सोनेगांव समाज भवन, दुर्गा मंदीर जवळ, सोनेगांव, प्रभाग क्र. ३६

५.     स्केटिंग हॉल, हनुमान मंदिर जवळ, गायत्री नगर, प्रभाग क्र. ३७

६.     महात्मा गांधी समाज भवनशितला माता मंदिरच्या बाजुला सुभाषनगर, रींग रोड

७.     मनपा शाळाशिवणगांव, प्रभाग क्र.३८

८. खामला आयुर्वेदीक, DISP, खामला, नागपूर

९. जयताळा UPHC, जयताळा, नागपूर

 

धरमपेठ झोन

१.     समाज भवन सभागृहजगदीश नगर

२.     दाभा मनपा शाळादाभा रिंग रोड

३.     आयुर्वेदिक रुग्णालय तेलंखेडीराम नगर

४.     शितला माता मंदिर समाज भवनसदर

५.     समाज भवनटिळक नगर

६.     डिक दवाखानाधरमपेठ व्ही.आय.पी. रोड

७.     बुटी दवाखानाटेम्पल रोडसिताबर्डी

८. इंदीरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, नागपूर

९. के.टी.नगर UPHC, के.टी.नगर, नागपूर

१०. स्टेशन मेडिकेअर सेंटर HQMC (U) एयर फोर्स, वायुसेना नगर, नागपूर

 

 

हनुमाननगर झोन

१.     आझमशाह शाळाशिव नगर, प्रभाग क्र. ३१

२.     दुर्गा नगर शाळाशारदा चौक, जुना सुभेदार, प्रभाग क्र. ३२

३.     जानकी नगरविठ्ठल नगर गल्ली नं. १, प्रभाग क्र. ३४

४.     मानेवाडा UPHC, शाहू नगरबेसा रोड, प्रभाग क्र. ३४

५.     म्हाळगी नगर शाळाम्हाळगी नगरपाण्याच्या टाकीजवळ, प्रभाग क्र. २९

६. कामगार राज्य विमा योजना रुग्णालय (ESIS) हॉस्पीटल, सक्करदरा, नागपूर

७. नरसाळा UPHC, नरसाळा, नागपूर 

 

धंतोली झोन

१.     साखळे गुरूजी शाळागणेशपेठ, प्रभाग क्र. १७

२.     राहुल संकुल समाज भावनगणेशपेठ, प्रभाग क्र. १७

३.     सेंट्रल रेल्वे रुग्णालयमनीष बेकरीअजनी, प्रभाग क्र. ३५

४.     गजानन मंदिर समाज भवन, दुलाबाई काचोरे ले-आउटमनीष नगर, प्रभाग क्र. ३५

५.     चिचभवन मनपा शाळाचिचभवन वर्धा रोड, प्रभाग क्र. ३५

६. ए.आय.आय.एम.एस. हॉस्पीटल, मिहान, नागपूर

७. आयसोलेशन हॉस्पीटील, इमामवाडा, नागपूर

८.  बाबुलखेडा डिस्पेन्सरी, बाबुलखेडा, नागपूर

९.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मेडीकल चौक, नागपूर

 

नेहरूनगर झोन

१.     शीतला माता मंदिर समाज भावनवाठोडागोपालकृष्ण नगर

२.     शिवमंदिर समाजभवननंदनवन पोलिस स्टेशन जवळ

३.     कामगार कल्याण कार्यालयलतीका भवन,‍ चिटणिस नगर

४.     इंदिरा गांधी समाजभवनबिडीपेठ

५. के.डी.के. आयुर्वेदीक हॉस्पीटल, के.डी.के.कॉलेज रोड, नंदनवन, नागपूर

६. नंदनवन UPHC, नंदनवन, नागपूर

७. दिघोरी हेल्थ पोस्ट., दिघोरी, नागपूर

८. ताजबाग हेल्थ पोस्ट, मोठा ताजबाग, नागपूर

 

गांधीबाग झोन

१.     अन्सार समाजभवनहाजी अब्दूल मस्जीद लिडर शाळे जवळ, प्रभाग क्र. ८

२.     भालदारपुरा UPHC, गांजीपेठ रोडअग्निशमन विभागाजवळ, प्रभाग क्र. १९

३.     नेताजी दवाखानापटवी मंदिर गल्लीटिमकी, प्रभाग क्र. ८

४.     दाजी दवाखानाशहिद चौकइतवारी, प्रभाग क्र. २२

५.     मोमिनपुरा मनपा शाळामोमिनपुरा, प्रभाग क्र. ८

६. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय, भोईपूरा, रामझुला जवळ, नागपूर

७. डागा हॉस्पीटल, गांधीबाग, नागपूर

८. महाल डायगोनेस्टीक सेंटर, महाल, नागपूर

९. हंसापूरी आयुर्वेदिक, हंसापूरी, नागपूर

 

सतरंजीपुरा झोन

१.     जागनाथ बुधवारी प्रा. मुलींची शाळाभारतमाता चौक

२.     मेहंदीबाग प्रा. शाळा, बाराईपुरा, लालगंज

३.     कुंदनलाल गुप्ता नगर मनपा शाळाकुंदनलाल गुप्ता नगर

४. मेहंदीबाग UPHC, मेहंदीबाग UPHC, नागपूर

५. लालगंज आयुर्वेदिक, ईतवारी दहीबाजार, नागपूर

 

लकडगंज झोन

१.     भरतवाडा प्रा. शाळाभरतवाडा रोड, प्रभाग क्र. ४

२.     मिनिमाता नगर प्रा. शाळामिनीमाता नगर, प्रभाग क्र. २४

३.     पारडी मनपा प्रा. शाळासुभाष चौक पारडी, प्रभाग क्र. २५

४.     कळमना मराठी प्रा. शाळाजुना कामठी रोडकळमना, प्रभाग क्र. ४

५ बाबुलबन आयुर्वेदिक डिस्पेंन्सरी, गरोबा मैदान जवळ, बाबुलबन, नागपूर

६. पारडी डिस्पेन्सरी, पारडी, नागपूर

 

 

 

 

आशीनगर झोन

१.     वैशालीनगर हिंदी उच्च प्रा. शाळा, वैशालीनगर बसस्टॉप, प्रभाग क्र. ६

२.     वांजरी हिंदी प्रा. शाळाविनोबा भावे नगर, प्रभाग क्र. ३

३.     ललितकला भवनठवरे कॉलनी, प्रभाग क्र. २

४.     एम.ए.के. आझाद हिंदी उर्दु शाळाआशीनगर, प्रभाग क्र. ७

५. PMH हॉस्पीटल A, बाळाभाऊपेठ, नागपूर

६. PMH हॉस्पीटल B, बाळाभाऊपेठ, नागपूर

७. कपील नगर UPHC, कपीलनगर, नागपूर

८. आंबेडकर हॉस्पीटल, इन्दोरा चौक, कामठी रोड, नागपूर

९. गरिब नवाज नगर हेल्थ पोस्ट, गरीब नवाज नगर, पवननगर जवळ, यशोधरा नगर, नागपूर

 

मंगळवारी झोन

१.     शक्यमुनी समाजभवनभीम चौकनागसेन नगर,

२.     सतरामदास धरमशाळाजरीपटका

३.     सेंट जॉन प्रायमरी  स्कुल, मोहन नगर,

४.     बोरगांव हिंदी प्रा. शाळापटेल नगरगोरेवाडा रोड

५.    पेंशननगर मनपा ऊर्दु उच्च प्राथमिक शाळा, जाफर नगर

६.      गोरेवाडा UPHC गोरेवाडा, नागपूर

७. नारा UPHC, नारा, नागपूर

८. इन्दोरा UPHC, इन्दोरा, नागपूर

९. पोलीस हॉस्पीटल, झिंगाबाई टाकळी, नागपूर

१०.डिवीजनल रेल्वे हॉस्पीटल, रेल्वे स्टेशन जवळ, नागपूर

११. सदर मनपा रोग निदान केन्द्र, सदर, नागपूर

१२. झिंगाबाई टाकळी UPHC सेंटर, झिंगाबाई टाकळी, नागपूर

 

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.