Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०१, २०२१

....अखेर कोरोनाने भाऊ अन् ताईना गाठलेच




एका वर्षाआधी कोरोना हे नाव जगातील सर्वच लोकांच्या कानावर पडले... अन् यमराजाचं दुसरं नावच कोरोना कि काय अशी धडकी या नावाने सर्वाना भरली. कस बस या संकटातून सर्व जग सुखरूप असल्याचें चित्र निर्माण झाले अन् आता आणखी हा विषाणू आल्याचे समजले...

सुरवातीचा काळात मदतीला जाण्यासाठी मोठं मोठे पुढारी देखील घाबरत होते. त्यावेळी जिल्ह्यातील शेवटचा माणूस या विषाणूच्या प्रादुर्भावाने नवे तर उपाशी मृत्यूला आलिंगन देता काम नये याकरिता खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पुढे येत खासगी, शासकीय यंत्रणेला कामाला लावले. घरी न बसता या विषाणूपासून लढण्याचे सामान्य जनतेला बळ देण्याकरिता ते प्रत्यक्ष गोरगरीब जनता, कामगार वर्ग यांच्या वस्त्यात जाऊन प्रत्यक्ष त्यांना मदत मिळवून दिली.

म्हणतात ना.. संघर्षाचे दिवस कधी विसरायचे नसतात. ते दिवस डोळ्यासमोर ठेऊन आपल्या सारख्याच लोकांना मदत करायची असतात. त्यामुळे भाऊ आणि ताई देखील आपल्या आचरणात देखील हा मंत्र नेहमी डोळ्यासमोर ठेऊन काम करताना दिसून येतात. मोठ्या प्रमाणात संघर्ष करून भाऊंनी आमदार आणि खासदार हे जनसेवेकरीता लोकशाहीच्या माध्यमातून समाजसेवेसाठी हे पद घेतले. त्या माध्यमातून लोकहितात्मक कार्य ते करीत असतात.

परंतु गोर, गरिबांच्या सेवेत नेहमी असणारे ताई आणि भाऊंना अखेर कोरोनाने गाठले.. परंतु आता मात्र या विषाणूपासून लढा देण्याकरिता त्यांना नेहमी बळ मिळावे आणि यातुन ते लवकरच बरे व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

आपला

- #गोविल_मेहरकुरे
९६८९९८८२८२

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.