Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १९, २०२१

कोरोनाविषाणूची साखळी तोडण्यासाठी जनजागृती

कोरोनाविषाणूची साखळी तोडण्यासाठी  जनजागृती



तिसऱ्या दिवशी शिबिर.

गावातील कर्मचारी व नागरिकांची तपासनी.

तिसऱ्या दिवशीही 90 लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 15 जन  कोवीड  बाधित निघाले.


राजुरा....


तालुक्यातील गोवरी येथे कोरोना बाधितांच्या उद्रेक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीही  अँटीजिन तपासणी शिबिर  सुरू आहे. गोवरी गावातील नोकरी करणारे व कामगारा अँटीजिन  तपासणीसाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे. बाहेर ये-जा करणाऱ्यांच्या माध्यमातून कोरोणा वेगाने पसरत असल्यामुळे सुपर स्प्रेडर गटाचे वेळीच निदान करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. कोरोनाविषाणू ची साखळी तोडण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून अँटीजीन तपासणीवर भर देण्यात येत आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपिनकुमार ओदेला यांनी दिली.


गौवरी गावात कोवीड रुग्णांचा उद्रेक झाल्यामुळे बल्लारपूर वेकोली अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना  वेकोली प्रशासनाने कोवीड तपासणी सक्तीची केलेली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने अँटीजीन तपासणी शिबिर लावण्यात आलेली आहे.मागील दोन आठवड्यापासून गौवरी गावात तापाची साथ सुरू आहे.तापाच्या साथीत गावातील दोन व्यक्ती दगावले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आरोग्य विभागाने शिबीर लावले.  तपासणी शिबिरात  गोवरी येथे रुग्णांची संख्या  वेगाने वाढली . त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये कोविंड संसर्ग टाळण्यासाठी गाव सील करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक स्वास्थ्य केंद्र कडोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओडेला  व त्यांची चमू यांनी सतत तीन दिवसपासून कुटुंब सर्वेक्षण व तपासणी शिबिर घेत आहे. गोवरी सभोवताल कोळसा खाणी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार व कामगार वर्ग गावात राहतो .नोकरीनिमित्त आणि कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्या गावात सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने कर्मचारी कामगाराने युवकांना ऑंटीजीन तपासणी करण्याचे आव्हान केले आहे. ज्यामुळे संसर्ग वाढणार नाही व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील.



युवक वर्गाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग वेगाने पसरतो . त्यामुळे तरुणांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये . गावात फिरू नये. तरुणांना संसर्ग झाल्यास घरातील वयोवृद्ध व्यक्तीला संसर्ग जास्त होण्याची भीती असते. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करावे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाला सहकार्य करावे.

डॉक्टर प्रकाश नगराळे,

 तालुका आरोग्य अधिकारी...


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.