गोंदिया जिल्ह्यातील बँकांची वेळ सकाळी 11.00 ते 3.00 वाजेपर्यंत
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.19 एप्रिल:-
ब्रेक द चैन अंतर्गत एक मे सकाळी 7.00 वाजेपर्यंत लाकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व बँकांची वेळ सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत चे आदेश आज दिनांक 19 एप्रिल ला दीपक कुमार मीना जिल्हाधिकारी गोंदिया यांनी काढले आहे. जिल्ह्यातील अग्रणी बँक बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून 20 एप्रिल पासून ते दिनांक 1 मेपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील सर्व बँकांचे ग्राहक सेवा व व्यवहाराबाबत चे कामकाज ही सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत विनंती केली होती. गोंदिया जिल्ह्यात covid-19 ची वाढती बाधित रुग्ण संख्या लक्षात घेऊन ,व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया गोंदिया यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार दिनांक 20 एप्रिल ते 1 मेपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील सर्व बँकांचे ग्राहक सेवा व व्यवहाराबाबत चे कामकाज सकाळी 11.00 वाजेपासून हे दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहितेचे कलम188 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, 55 व 56 अन्वये संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी आदेशात दिला आहे.