गोंदिया जिल्ह्यातील सर्व दुकाने व प्रतिष्ठानांची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.19 एप्रिल:-
Covid-19 कोरोनाव्हायरस विषाणूचा संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आपत्कालीन उपाय योजनेचा एक भाग म्हणून दिनांक 14 एप्रिल चे रात्री 8.00 वाजेपासून ते दिनांक 1 मे च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत संपूर्ण गोंदिया शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली सर्व प्रकारची दुकाने प्रतिष्ठाने ही संचार बंदी च्या कालावधीत दिनांक 30 एप्रिल पर्यंत यापुढे सकाळी 7.00 वाजेपासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत खुली राहतील. जीवनावश्यक वस्तू मध्ये मोडणारे किराणा, भाजीपाला, फळे,दुध डेअरी, मिठाई,बेकरी, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने,मटण,चिकन,मासे,अंडी विक्री चे ई.दुकाने व अत्यावश्यक सेवेत समावेश केलेले दुकाने सकाळी 7.00 वाजे पासून तर दुपारी 3.00 वाजे पर्यंत सुरू राहतील.
मात्र सर्व प्रकारची हॉस्पिटल, उपचार केंद्रे, लसीकरण केंद्रे, रुग्णालय, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकाने, औषधी निर्माता कंपन्या, वैद्यकीय उत्पादनास संबंधित व वितरणा संबंधित विक्रेते यांची वाहतूक व त्यासंबंधी असलेली पुरवठासाखळी, औषधालय, रुग्णालय, नर्सिंग होम व वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका तसेच इतर वैद्यकीय व आरोग्य सुविधा, सेवा, लसीकरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे व त्याबाबत कच्चामाल पुरविणारे उत्पादक व वितरक, पेट्रोल पंप, पेट्रोलियम पदार्थ संबंधित उत्पादने, एटीएम केंद्रे यांना यातून वगळण्यात आलेले आहे. त्यांच्या या पूर्वी ठरलेल्या वेळा राहतील. सदर आदेश आज आज 19 एप्रिल च्या रात्री आठ वाजेपासून अमलात येणार आहे असेही या आदेशात म्हटले आहे.