राजूऱ्यात जनता कर्फ्यू उत्स्फूर्त प्रतिसाद
राजुरा...
चंद्रपूर जिल्हयासह राजुरा विधानसभा क्षेत्रात कोरोनाचा वाढता संक्रमण लक्ष्यात घेता कोरोनाविषाणू ची साखळी तोडण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजुरा शहरात आज दिनांक 19 एप्रिल ला कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला . संकट काळात लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे,
तहसीलदार हरीश गाडे,मुख्याधिकारी जूही अर्शिया यांनी जनतेचे आभार मानले आहे. पुढील सात दिवस अशाच पद्धतीने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिनांक १९ एप्रिल ते २६ एप्रिल सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाडून स्वतःचे आरोग्य जपावे. कोरोणाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात आज विदारक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आरोग्य सेवेअभावी प्राण गमवावे लागत आहे. ही विदारक परिस्थिती थांबविण्यासाठी, स्थानिक जनतेचे आरोग्य व जिवीताचे संरक्षण करण्यासाठी स्वतः जनतेलाच पुढाकार घेऊन या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा , कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील सर्व जनतेनी जनता कर्फ्युला सहकार्य करून स्वतःची परिवाराची व जनतेची काळजी असे आवाहन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जनतेला केले आहे. यात फक्त सकाळी ६ ते ९ दरम्यान दुध सुरू राहील आणि आरोग्य सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना सेवा बंद ठेऊन व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे असे प्रशासनाने आव्हान केले आहे.