Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०५, २०२१

आठवा मैल अपघातात दोन युवकांचा मृत्यू


आठवा मैल अपघातात दोन युवकांचा मृत्यू
नागपूर / अरुण कराळे (खबरबात )
पोलीस स्टेशन वाडी हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील आठवा मैल भरतनगर जवळ शनिवार ३ एप्रिल रोजी रात्री ८ .३० वाजताच्या दरम्यान अज्ञात ट्रक चालकाने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार फिर्यादी सुमित सुरेश वानखेडे वय २८ वर्ष, राहणार मोहाडे ले-आऊट आठवा मैल व मृतक शुभम रमेश नवाडे वय २२ वर्ष रा . मोहाडे ले-आउट आठवा मैल,फिरोज सलीम शेख वय २३ रा . तिजारे ले-आउट आठवा मैल हे तिघेही गोंडखैरी स्थित ब्लू स्टार कंपनीच्या गोडाऊनमध्ये हातमजुरीचे काम करीत होते.नेहमीप्रमाणे तिघेही टीव्हीएस स्कुटी क्रमांक एम . एच .४० -एक्स ३८७० ने कामावर गेले दिवसभर गोडाऊनमध्ये काम केल्यानंतर सायंकाळी घरी परत येत असताना अपघातात जखमी झालेला सुमित वानखेडे हा मोपेड चालवीत होता तर मृतक शुभम नवाडे मधात तर फिरोज शेख हा मागे बसला होता.भरत नगर जवळ असलेल्या रस्त्यावर गतिरोधक असल्याने सुमीतने गाडीचा वेग कमी केला याच दरम्यान रात्री ८ .३० च्या दरम्यान अज्ञात ट्रक चालकाने भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवीत पाठमागून येत मोपेडला जबर धडक दिल्याने स्कुटीवरील तिघेही खाली पडले असता फिर्यादी सुमित याच्या कपाळाला व हाताला किरकोळ मार बसला तर मृतक शुभमच्या डोक्याला जास्त मार लागल्याने तो जागीच मृत झाला व फिरोज उपचारा दरम्यान मृत झाला.घटनेची माहिती कुणीतरी वाडी पोलिसांना देताच पोलिसांनी उपचारार्थ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले.तसेच अज्ञात ट्रक चालकाच्या विरुद्ध कलम ३०४ अ, २७९ , ३३७ , ३३८ सहकलम १३४ , १७७ , १८८ , १८५ नुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात वाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.