Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल २५, २०२१

महावितरणचे 'अपडेट्स' मिळण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे महावितरणचे आवाहन


नागपूर ,दि २५ एप्रिल २०२१:
महावितरणकडून ग्राहकांना वीज सेवेबाबत ग्राहकांना उपयुक्त असणाऱ्या माहितींचे विविध 'अपडेट्स' सातत्याने देण्यात येतात. हे 'अपडेट्स' ग्राहकांनी महावितरण कडे नोंदविलेल्या अधिकृत मोबाईलवर पाठविण्यात येतात. त्यामुळे अशी महत्वपूर्ण माहिती प्राऊट करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून या सेवाच लाभ घ्यावा,असे आवाहन महावितरणनच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभीयंता दिलीप दोडके यांनी केले आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अशा एकूण १६ लाख ३७ हजार ६२३ वीज ग्राहकांपैकी मार्च-२०२१अखेर १४ लाख ९२ हजार ८५५ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमाकांची आतापर्यंत नोंदणी महावितरकडे केली आहे. या सर्व ग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील *'एसएमएस'* द्वारे देण्यात येत आहे.

पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींची माहिती दरमहा ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर 'एसएमएस'द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येते.

नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ३लाख ८३हजार १२२ वीज ग्राहकापैकी ३ लाख ४५ हजार २९ वीज ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरण कडे नोंदवले आहेत. सावनेर विभागातील १लाख ०३हजार ७४० पैकी ९६,४९६ वीज ग्राहकांनी, कटोल विभागातील ७८,२०३ वीज ग्राहकापैकी ७२,६५४ वीज ग्राहकांना महावितरणच्या वतीने वरील सुविधा मिळत आहे.

नागपूर शहर मंडलात येणाऱ्या ९लाख १८ हजार ८६६ वीज ग्राहकांपैकी ८लाख ३८हजार ८७१ ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळतो आहे. वर्धा जिल्ह्यातील ३लाख ३६ हजार ५३५ पैकी ३लाख ८हजार ७६५ ग्राहक या सुविधांचा लाभ घेत आहे.

ज्या ग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांना महावितरणच्या *9930399303* या क्रमांकावर *'एसएमएस* 'द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG (स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून 9930399303 क्रमांकावर 'एसएमएस' केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24x7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अँपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी तसेच घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहकांनीही आपल्या मोबाईलची नोंदणी करून महावितरणच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.