Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १८, २०२१

६०० बेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा ऑक्सीजन प्लांट चंद्रपूरात धूळखात


लोक मरणाच्या दारात:अन चंद्रपूरातला अडीच कोटी रुपयांचा ऑक्सीजन प्लांट बंद
चंद्रपूर/ललित लांजेवार:
कोरोनाचे डबल म्युटेशन होत असताना आरोग्य व्यवस्थेचे पूर्णता धिंडवडे उडाले आहेत. चंद्रपुरातही ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे लोक कसे मरतात याचं उदाहरण समोर आले आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून अश्यातच मृतांची संख्या देखील वाढतच जात आहे. ऑक्सीजन बेडची कमतरता आणि व्हेंटिलेशन बेडची कमतरता देखील जाणवत आहे.




ऑक्टोबर 2020 मध्ये चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 600 बेड ऑक्सिजन पुरवठा करता येईल इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन प्लांट ची निर्मिती करण्यात आली.यासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आजही चंद्रपुरात हा प्लांट बंद अवस्थेत धूळखात पडला आहे.



जनतेच्या खिशातले अडीच कोटी रुपये मंत्रीमहोदयांनी खर्च तर केले मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सीजे न ची गरज असताना चंद्रपूरकरांना ऑक्सिजन मिळत नाही ही चंद्रपुरानसाठी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
चंद्रपुरात लोक ऑक्सिजन बेड मिळत नाही म्हणून दवाखाने फिरत आहेत याशिवाय चंद्रपूर ते तेलंगणा आणि तेलंगणा वरून परत चंद्रपूर गिर्ट्या घालत आहेत. अनेकांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे फुटपाथवर पडून उपचार करावा लागत आहे. आणि सिरीयस पेशंटला ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे तिथेच आपला जीव सोडावा लागत आहे.

चार आठवड्यात सुरू होऊ शकणारी ऑक्सिजनची यंत्रणा सहा महिने लोटून देखील सुरू होऊ शकत नसेल तर या तर हे राजकारणी पुढाऱ्यांचे अपयशच समजावे लागेल.
 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.