Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०८, २०२१

नागपुरकर महिलांनी केले जागतिक महिला दिवसाचे शंखनाद करुन स्वागत

नागपुरकर महिलांनी केले जागतिक महिला दिवसाचे शंखनाद करुन स्वागत




नागपुर

तारीख मार्च २०२१

( प्रतिनिधी )

नागपुरकर महिलांनी आज जागतिक महिला दिवसाचे शंखवादन करुन अपुर्व स्वागत केले... अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट वर स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला साक्षी ठेवत महिलांनी  नारीशक्तीचा शंखनाद केला...यावेळी भारताच्या या लेकींनी की मातृभूमी करिता सदैव अग्रेसर राहण्याची शपथ घेतली आणि भारत मातेचा  जयजयकार केला..... 

 

नागपुरात आजपासुन महिलांच्या शंखनाद प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला....सामान्यपणे शंखवादन हा पुरुषांच्या मक्तेदारीचा प्रांत....पण महिलांनाही शंख वादनाचा अधिकार आहे...आवश्यकता आहे ती शंख वादन कसे करावे आणि शंख ध्वनी कसा काढायचा याचे तंत्र शिकण्याची...नेमके हे तंत्र महिलांना आता शिकविले जाणार आहे...याकरिता हंसाबेन पाघडाल यांनी पुढाकार घेतला आहे....केणतेही शुल्कलन आकारता महिलांना शंखवादन शिकवले जाईलअसे पाघडाल यांनी सांगितले...

 

हंसाबेन पाघडाल यांनी सींगितले कीशंख वादन करणे आणि शंख ध्वनी ऐकणेदोन्हीही लाभदायक आहे...महिलाहीनशंखवादन करु शकतात....आवश्यकता आहे ती शंखवादनाचे तंत्र शिकण्याची...हे तंत्रच इच्छुक महिलांना शिकविले जाईल...पाघडाल यांनी कोरोना लॉकडाऊनचा उपयोग करुन घेत १५ महिलांना शंखवादन शिकविले....आता या १५ महिलांच्या मदतीनें नागपुरीतील किमान १०० महिलांना हे तंत्र शिकविण्याचा त्यांचा मानस आहेआजपासुन या शंखवादन प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला...

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.