घरकुल बांधकामाचा प्रलंबित निधी तात्काळ उपलब्ध करून द्या -किशोर तरोणे
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.1 मार्च:-
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घरकुल बांधकामाचे प्रलंबित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी दि.1 मार्च रोजी आयुक्त नरेगा, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने मधून 2018-19 या आर्थिक वर्षात एकूण 44 घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अकुशल कामाचे निधी उपलब्ध झालेला आहे. परंतु कुशल कामावर करण्यात आलेला खर्च अजून पर्यंत लाभार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे घराचे बांधकाम करताना पुर्वीच अडचणीत असलेला सामान्य लाभार्थी मागील दोन वर्षापासून निधी न मिळाल्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्हास्तरावर वारंवार विचारणा केली असता, अजून पर्यंत समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अतिशय गरीब गरजू लोकांच्या घरकुलांचे बांधकामाचे पैसे तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी या निवेदनातून तरोणे यांनी केली आहे