Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १४, २०२१

महावितरण अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल





नागपूर, दिनांक १४मार्च २०२१-
थकीत वीज देयकाचा भरणा करावा यासाठी वारंवार आठवण करुन दिल्यानंतरही पैसै न भरणाऱ्या वीज ग्राहकाच्या नातेवाईकाने महावितरण कडून वीजपुरवठा खंडित केल्याने सहाय्यक अभीयंत्यास अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोनेगाव परिसरात शनिवारी संध्याकाळी घडली.या प्रकरणी महावितरण कडून सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शनिवार दिनांक १३मार्च रोजी महावितरणच्या सोमलवाडा शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभीयंता संजीव भक्ते हे सोनेगाव तलाव परिसरात प्रकाश निकम,अशोक पेठे,रितेश कोहळे,राहुल यादव,सुजीत पाठक या आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन थकबाकीची वसुली करीत होते.तसेच वीज देयकाची रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करीत होते.परिसरातील सयद अमीन,चांदपाशा अमीन सयद या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्यावर चर्चा करून पुढील कामाचे नियोजन करीत होते. इतक्यात MH 40-KR 3451 या क्रमांकाच्या झिनीया गाडीतून आलेल्या दोन इसमांनी सहाय्यक अभीयंता संजीव भक्ते यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मारहाण करण्याच्या हेतूने अंगावर धावून गेले.परंतु महावितरचे ६-७ कर्मचारी एकत्रित असल्याने मारहाण करता आली नाही. या घटनेनंतर सहाय्यक अभीयंता संजीव भक्ते यांनी थेट सोनेगाव पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार दाखल केली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम ३५३, २९४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहे.सदर घटनेचे महावितरण कडून छायाचित्रण करण्यात आले असून या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याची विनंती महावितरणने पोलिसांना केली आहे.

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्या करणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. अशा प्रकरणात दोषी आरोपीस कारावास आणि आर्थिक दंडाची तरतुद कायद्यात केली आहे. याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.