Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०३, २०२१

आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त करताच गॅलरीतील आमदारांना मिळाला लॅपटाँप

 आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त करताच गॅलरीतील आमदारांना मिळाला लॅपटाँप


 

       कोरोनामूळे अधिवेशनात सामूहिक अंतर राखल्या जावे यासाठी काही आमदारांना गॅलरीत बसविण्यात आले आहे. मात्र या आमदारांना लॅपटाँप दिल्या गेल्या नसल्याने सभागृहातील कामकाज पाहण्यास अडचण येत होती. यावर काल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनतर आज येथील सर्व आमदारांना लॅपटाँप उपलब्ध करुन देण्यात आले.
 
        मध्यंतरी कमी झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्याने सभागृहात कोरोना बाबतचे सर्व नियम पाळल्या जात आहे. अधिवेशनादरम्याण सामुहिक अंतर पाळल्या जावे या करीता एका बेंचावर एका आमदारालाच बसविण्यात येत आहे. तर उर्वरीत आमदारांसाठी सभागृहातील गॅलरी येथील बेंचेस आरक्षीत करण्यात आले आहे. मात्र गॅलरीत बसणा-या आमदांराकडे लॅपटाँप न दिल्या गेल्याने सभागृहातील कामगाज पाहणे व ते समजने अवघड झाले होते. त्यामूळे काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना  आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकारावर असंतोष व्यक्त केला होता. याची दखल सभागृहाच्या वतीने घेण्यात आली असून आज पासून गॅलरीत बसणा-या सर्व आमदारांना लॅपटाँप उपलब्ध करुन देण्यात आले आहेत...

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.