Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०२, २०२१

दहावी - बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

दहावी - बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

नागपूर दि. 2 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा (सर्व साधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (पुनर्रचित व जुना अभ्यासक्रम) शुक्रवार, दिनांक 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्च ऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होणार आहेत.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रके मंडळाच्या www.maharashtraboard.in अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 26 फेब्रुवारीपासून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम राहील. शाळा तसेच महाविद्यालयांना दिलेल्या छापील वेळापत्रकावरुन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी. सोशल मीडिया, व्हॉट्स ॲप अन्य यंत्रणा किंवा तत्सम माध्यमातून छपाई केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा व महाविद्यालयांना मंडळामार्फत कळविण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.