चंद्रपुरात ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसची स्थापना
खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमचंद्रपूर : व्यवसायिकांमधील व्यावसायिक क्षमता वाढवून त्या क्षमतांचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशातून भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाने खासदार डॉ. शशी थरूर यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया प्रोफेशनल्स कांग्रेसची स्थापना केली. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते या काँग्रेसची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाला चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी (ग्रामीण) अध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांची उपस्थिती होती. प्रा. राघोबा आलम यांनी संविधानाच्या प्रkस्ताविकेचे वाचन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. खासदार बाळू धानोरकर यांनी एआईपीसी च्या कार्याची माहिती देत मार्गदर्शन केले. प्रकाश देवतळे, रामू तिवारी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. चंद्रपुर अध्यायचे अध्यक्ष मनीष तिवारी, उपाध्यक्ष योगानंद चंदनवार यांनीही या अभियानाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
संचालन ऍड. प्रितिशा शाह, प्रा. किशोर महाजन यांनी, तर आभार रामकृष्ण कोंद्रा यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत डॉ. सुधीर पोडे, यूनुस शेख, भूपेश रेगुंडवार यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सुजीत मंडल व सुमेर कुरेशी यांनी केले. कार्यक्रमला चंद्रपुर जिला सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके , महाराष्ट्र महिला कांग्रेस सचिव श्रीमती नम्रता आचार्य- ठेमस्कर, चंद्रपुर जिला महिला कांग्रेस अध्यक्ष (ग्रामीण) चित्रा डांगे, चंद्रपुर शहर महिला कांग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी महापौर संगीता अमृतकर, नगरसेविका सुनीता लोडिया, कुणाल चहारे, नाहिद मैडम, प्रवीण पड़वेकर, सिद्दीकी यांची उपस्थिती होती.
आयोजनासाठी एआईपीसीचे सदस्य एजाज भाई, प्रा. शफीक गुरुजी, विवेक देवगड़े, किशोर जोगी, निसार शेख, नितिन अंदेलकर, अमोल वडसकर, राकेश शिंदे, प्रदीप प्रधान, विवेक खुटेमाटे यांनी सहकार्य केले.