Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १९, २०२१

गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


            मुंबईदि. १७ : ऑलिम्पिककॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे  या  हेतुने  केंद्र शासनामार्फत गुणवंत खेळाडू पेन्शन योजना ( SPORTS FUND FOR PENSION TO MERITORIOUS SPORTS PERSON)सुरू करण्यात आली असून राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा विभागाचे आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

            भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणेसक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही योजना राबवत आहे.

       या योजनेच्या प्रस्तावासाठी   अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवासी असावा  त्याने ऑलिम्पिकपॅरा ऑलिम्पिक गेम्सकॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्णरौप्य व कांस्य पदक प्राप्त केलेले असावा. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त / गुणवंत खेळाडूस खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे.

            ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक दरमहा २० हजार रुपये मानधन,सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १६ हजार रुपये, रौप्य व कांस्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्सस्पर्धेत समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १४ हजार रूपयेसुवर्ण पदक - कॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्सपॅरा एशियन गेम्स १४ हजार रुपये आणि रौप्य व कांस्य पदक - कॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्सपँरा एशियन गेम्स १२ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

       दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धा करिता योजना लागू राहणार आहे. याबाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव / आयुक्तक्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे

https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.