Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १५, २०२१

डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा नियमबाह्य प्रस्ताव अमान्य....पप्पू देशमुख


आमदार अभिजित वंजारी डेरा आंदोलनातील कोविड योध्द्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार


चंद्रपूर :  इंटरनॅशनल व अभिजीत सिक्युरिटी एजन्सीने किमान वेतन कायदा तसेच विविध कामगार कायद्यांचे उल्लंघन केले, प्रत्येक कामगारांच्या खात्यात दरमहा ३ ते ४ हजार रुपये कमी पगार टाकला.त्यामुळे शासनाने ५ मार्च २०२० रोजी दोन्ही कंत्राटदारांचे कंत्राट रद्द केले. आता पुन्हा त्याच कंत्राटदारांना मुदतवाढ देऊन कंत्राटी कामगारांचे पगार करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. मनोहर भेंडे यांनी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष देशमुख यांना दिलेला आहे.विशेष म्हणजे शासनाकडून दबाव आणल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे यांनी डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठित केलेली आहे.यामध्ये विभाग प्रमुख डॉ.मनोहर भेंडे,डाॅ.राजेंद्र सुरपाम तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड यांचा समावेश आहे. आंदोलनावर तोडगा काढण्याच्या हेतूने डाॅ. भेंडे यांनी जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्याशी चर्चा करून जुन्या कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याचा तसेच त्यांच्यामार्फत कामगारांचे पगार देण्याचा प्रस्ताव ठेवला.दोन्ही दोषी कंत्राटदाराना मुदतवाढ दिल्याने कामगार पुन्हा किमान वेतनापासून वंचित राहतील.अशा प्रकारे दोषी कंत्राटदारांना मुदतवाढ देणे नियमबाह्य असून कामगारांनी केलेल्या कामाचे पूर्ण दाम मिळाल्याशिवाय डेरा आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका देशमुख यांनी व्यक्त केली.


आमदार अभिजित वंजारी कोविड योध्द्यांच्या थकीत पगाराबाबत पाठपुरावा करणार


काल दिनांक १२ मार्च रोजी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी डेरा आंदोलनाबाबत माहिती दिली. यानंतर आमदार वंजारी यांनी जनविकास चे अध्यक्ष देशमुख यांना फोन करून डेरा आंदोलनातील ५०० कोविड योध्द्यांच्या थकीत पगारासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा शब्द दिला. काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या अॅड. विजया बांगडे यांनीसुद्धा या आंदोलनाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केलेला आहे.


वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कार्यालयातून 'जनविकास'चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना फोन करून डेरा आंदोलनाबाबत पूर्ण माहिती घेतली..


दिनांक ११ मार्च रोजी सकाळी ११.१५ वाजता च्या सुमारास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या खाजगी सचिवांनी जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या मोबाईलवर फोन केला.वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांच्या निर्देशानुसार पप्पू देशमुख यांच्याकडून आंदोलन व कामगारांच्या समस्यांबाबत पूर्ण माहिती घेऊन त्याची लेखी माहिती मंत्री अमित देशमुख यांना देण्यात आली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.