Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ३१, २०२१

दिपालीची आत्महत्या प्रशासकीय व्यवस्थेचा बळी

 दिपालीची आत्महत्या प्रशासकीय व्यवस्थेचा बळी



📌प्रकरणाची CID मार्फत चौकशी करा

📌सामाजिक संघटनांची मागणी

नागपूर  :- हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हा प्रशासकीय व्यवस्थेचा बळी आहे. या प्रकरणात वनविभागातील आर्थिक घबाड कारणीभूत आहे. त्यामुळे या प्रकरणी CID चौकशी करून उपवनसंरक्षक शिवकुमार व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आज (ता ३०) सामाजिक संघटनांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक साई प्रकाश यांच्याकडे भटक्या विमुक्तांतर्फे श्री रोहित माडेवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. 
               हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व युवा ओबीसी तरुणी दीपाली चव्हाण यांना डिएफओ विनोद शिवकुमार वनविभागातील आर्थिक गैरव्यवहारासाठी मानसिक व शारीरिक त्रास देत होते. वनप्रशासन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने दिपाली परिसरात कार्य करीत असल्याने त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. गर्भवती असताना तब्बल तीन किलोमीटर जंगलात चालविल्यामुळे त्यांचा गर्भपात झाला. 
वनविभागातील तस्करांना लगाम घालण्यासाठी उचलेले धाडसी पाऊल वरिष्ठांना खुपले असल्याने DFO विनोद शिवकुमार यांनी त्यांचा अन्ववीत छळ केला. या प्रकरणाची तक्रार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना वारंवार करण्यात आली. मात्र रेड्डी यांनी याकडे दुर्लक्ष करून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठबळ देऊन महिला अत्याचारात आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदविला. आत्महत्या करण्यापूर्वी दुर्दैवी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सर्व घटनाक्रम नमूद केला आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व रेड्डी यांना सेवेतून बडतर्फ करीत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,  मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील सहभागी सर्व व्यक्तींचा आरोपी म्हणून सहभाग निश्चित करावा, या प्रकरणाची शासनाने CID मार्फत चौकशी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी बांधवांतर्फे तिव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा भटक्या विमुक्तांतर्फे डॉ रोहित माडेवार, ओबीसी नेते श्री मिलिंद वानखेडे, भटक्या विमुक्त कर्मचारी संघटनेचे संघटक खिमेश बढिये, सौ सिमा कश्यप, सुनील शेलारे, सुबोध जंगम यांनी दिला आहे.

-------------((-------------------------
यासंदर्भात बेलदार समाज संघर्ष समितीतर्फे सुध्दा अध्यक्ष राजेंद्र बढिये यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात मुकुंद अडेवार, विनोद आकुलवार, अर्चना कोट्टेवार यांचा समावेश होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.