Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च २३, २०२१

महाराष्ट्रातील ही १२ घराणी सत्तेचे राजकारण ठरवतात

 महाराष्ट्रातील ही १२ घराणी सत्तेचे राजकारण ठरवतात 


फेसबुक लिंक http://bit.ly/3lE60xZ
🍄दि. २३ मार्च २०२१
महाराष्ट्रात अशी काही राजकीय घराणी आहेत की तीच राजकीय सत्तेची चावी आपल्या हातात ठेवून सत्ता कोणाची हे ठरवत असतात.मग यांचा पक्ष कोणताही असो त्याचा फारसा फरत पडत नाही.

महाराष्ट्रातील ही १२ घराणी सत्तेचे राजकारण ठरवतात,These 12 families in Maharashtra decide the politics of power

              पवार, ठाकरेंपासून चव्हाण, पाटीलपर्यंत... या कुटुंबांच्या अवतीभाेवतीच महाराष्ट्राची सत्ता फिरत असते.अनेक दशकांपासून यातील काही कुटुंबांचे किती तरी जागांवर वचस्व आहे. यावरून त्यांचा दबदबा व मानाचा अंदाज लावता येऊ शकताे. जसे- बारामती... ही जागा ४० वर्षांपासून पवार कुटुंबाकडेच आहे.हे घराणे महाराष्ट्रातील राजकारणातील प्रतिष्ठित घराणे आहे.महाराष्ट्रात सत्ता कोणाची हे ठरवायची हुकमत या पवार घराण्यात आहे.
🔹बारामतीचे पवार घराणे (४ पिढ्या)
शारदाबाई पवार :१९३६मध्ये पुणे लोकलबोर्डाच्या सदस्या.
पुत्र: शरद पवार : ३८ व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. चारदा मुख्यमंत्री. स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. यूपीएत मंत्री हाेते.
नातू : अजित पवार :शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे उपमुख्यमंत्री हाेते. बारामतीतून आमदार.
नात : सुप्रिया सुळे:२००६ मध्ये राज्यसभा सदस्य, तर २००९ व २०१४ मध्ये बारामतीतून खासदार बनल्या.
पणतू : रोहित-पार्थ : शरद पवारांचे नातू राजकारणात सक्रिय. या वेळी निवडणूक लढवणार.शिवसेनेचे जसे मुंबईत आहे तसेच या कुटुंबाचे बारामतीत वर्चस्व आहे.
🔹 मुंबईचे ठाकरे घराणे  (३ पिढ्या)
बाळासाहेब ठाकरे :१९ जून १९६६ राेजी शिवसेनेची स्थापना.
पुत्र:उद्धव ठाकरे २०१९ साली अनपेक्षित रित्या महाराष्ट्ाचे मुख्यमंत्री झाले.
नातू : आदित्य ठाकरे:शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष. शिवसेनेत क्रमांक दाेनचे पद.सध्या पर्यावरण मंत्री.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ ठाकरे कुटुंबाचे घर 'मातोश्री' चा आदेशच मुंबईत अंतिम मानला जाताे. त्यांच्या मंजुरीविना या शहरात काेणताही अधिकारी राहू शकत नाही इतका दरारा.
पुतण्या : राज ठाकरे
:राेखठाेक व करारी स्वभाव. शिवसेनेत मतभेदानंतर स्वत:चा पक्ष मनसेची स्थापना.
🔹गोपीनाथ मुंडे  घराणे  (२ पिढ्या)
गोपीनाथ मुंडे: भाजपचे दिग्गज दिवंगत नेते. महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. केंद्रात मंत्री झाले. मोठी मुलगी पंकजा महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री होत्या. दुसरी मुलगी प्रीतम बीडच्या खासदार आहेत.
पुतण्या धनंजय मुंडे अगोदर भाजप मध्ये सक्रीय होते नंतर मतभेदांमुळे राष्ट्रवादीत गेले.विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.या घराण्याचे बीड जिल्हावर वर्चस्व आहे.
🔹एकनाथ खडसे घराणे (२ पिढ्या)
एकनाथ खडसे: भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री. भाजपमध्ये घुसमट होऊ लागल्याने एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्ष जवळ केला.सध्या महाराष्ट्र मंत्री.खडसेंची पत्नी मंदा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा, मुलगी रोहिणी जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष. खडसेंची सून रक्षा खडसे रावेरमधून लोकसभेच्या विद्यमान खासदार आहेत.
🔹शंकरराव चव्हाण घराणे (२ पिढ्या)
शंकरराव चव्हाण: काँग्रेसतर्फे दोनदा मुख्यमंत्री. आधी १९७५, नंतर १९८६ मध्ये. केंद्रात अर्थ आणि गृहमंत्री होते. मुलगा अशोक चव्हाणही मुख्यमंत्री राहिले आहेत. अशोक यांची पत्नी अमिता आमदार राहिल्या आहेत. नांदेड जिल्हा वर चव्हाण कुटुंबाचे राजकीय वर्चस्व आहे.
🔹 शिवाजीराव पाटील निलंगेकर (३ पिढ्या)
शिवाजीराव निलंगेकर १९८५-८६ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसचे दिग्गज नेते. त्यांचा मुलगा दिलीप आमदार होते. सून रूपाताई खासदार होत्या. नातू संभाजी राज्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री होते.
🔹वसंतदादा पाटील  घराणे (3 पिढ्या)
१९७७ ते ७८ मुख्यमंत्री होते. १९८३ ला पुन्हा सीएम होते..आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, वसंतदादाच्या पत्नी शालिनीताई कॅबिनेट मंत्री होत्या. १९८० मध्ये खासदार झाल्या. मुलगा प्रकाश २००९ च्या आधी सांगलीचे खासदार होते.पुतण्या मदन पाटील खासदार व मंत्री होते.दादांचे नातू प्रतीक २००९ मध्ये सांगलीचे खासदार होते.एकेकाळी या घराण्याचे सांगली जिल्हा वर वर्चस्व होते.
🔹छगन भुजबळ कुटुंब (२ पिढ्या)
छगन चंद्रकांत भुजबळ: बाळासाहेब ठाकरेंमुळे प्रभावित होऊन शिवसेनेत दाखल झाले. १९८५ मध्ये मुंबईचे महापौर होते. कट्टर हाडाचा शिवसैनिक म्हणुन ख्याती होती.मतभेदामुळे १९९१ मध्ये कॉंग्रेस प्रवेश केला. नंतर राष्ट्रवादीत गेले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. मुलगा पंकज आमदार राहिले. पुतण्या समीर २००९ मध्ये खासदार होते.सध्या भुजबळ मंत्री आहेत.
🔹 शंकरराव मोहिते पाटील (३ पिढ्या)
साखर सम्राट म्हणुन ख्याती असलेले अकलुजचे शंकरराव पाटील १९५२ ते १९७२ पर्यंत सक्रिय. ते ४ वेळा आमदार होते. मुलगा विजयसिंह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते होते मतभेदामुळे ते भाजप मध्ये गेले.राज्याचे ते उपमुख्यमंत्रीही होते. त्यांचे भाऊ प्रताप भाजप खासदार होते. विजयसिंहांचा मुलगा रणजीत हे राज्यसभा खासदार होते.सोलापुर जिल्हा वर मोहीते पाटील घराण्याची हुकमत आहे.त्यांचा पक्ष कोणता हे महत्त्वाचे ठरत नाही
🔹विखे पाटील घराणे (३ पिढ्या)
बाळासाहेब विखे पाटील: बाळासाहेब विखे पाटील काॅन्ग्रेस मधुन सात वेळा अहमदनगर उत्तरमधून जिंकले.शिवसेनेत जाऊन केंद्रात मंत्री झाले. मुलगा राधाकृष्ण महाराष्ट्रात काही काळ शिवसेनेत होते.परत कॉंग्रेस मध्ये येऊन विरोधी पक्षनेते होते आता ते भाजप मध्ये आहेत. राधाकृष्ण यांची पत्नी शालिनी अहमदनगरच्या जि. प. अध्यक्ष होत्या. मुलगा सुजय भाजप मधुन खासदार आहेत. या घराण्याचे पुर्ण नगर जिल्हा वर वर्चस्व आहे.
🔹पंतगराव कदम  घराणे (२ पिढ्या)
 शिक्षण सम्राट पतंगराव महाराष्ट्रात मंत्री होते. मुलगा विश्वजीत युकाँ अध्यक्ष व मंत्री आहेत.तर भाऊ मोहनराव कदम आमदार आहेत.
🔹 विलासराव देशमुख घराणे (२ पिढ्या )
विलासराव मुख्यमंत्री होते.लातुर जिल्हा वर एकतर्फी वर्चस्व आहे. मुलगा अमित देशमुख  आमदार.व मंत्री आहेत.
वरील घराणी पाहिली की लक्षात येईल की या घराण्याच्या भोवती महाराष्ट्रातील सत्ता फिरत असते.

________________________________
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
⛱ माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  ⛱   
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
.           _爪卂卄丨ㄒ丨
=============================
 These 12 families in Maharashtra decide the politics of power



 March 23, 2021
There are some political families in Maharashtra who keep the key of political power in their hands and decide who has the power. So, no matter which party they belong to, it doesn't matter much.
These 12 families in Maharashtra decide the politics of power,

              From Pawar, Thackeray to Chavan, Patil ... the power of Maharashtra revolves around these families. For many decades, some of these families have been occupying many seats. From this, their dominance and prestige can be estimated. Like- Baramati ... This place has been with the Pawar family for 40 years. This family is a prestigious family in the politics of Maharashtra.
Baramati's Pawar family (4 generations)
Shardabai Pawar: Member of Pune Local Board in 1936.
Son: Sharad Pawar: At the age of 38, Sharad Pawar became the Chief Minister of Maharashtra. Four times CM. Formed his own Nationalist Congress Party. There are ministers in the UPA.
Grandson: Ajit Pawar: Sharad Pawar's nephew Ajit Pawar is the Deputy Chief Minister. MLA from Baramati.
Granddaughter Supriya Sule: Member of Rajya Sabha in 2006, and MP from Baramati in 2009 and 2014.
Son-in-law: Rohit-Parth: Sharad Pawar's grandson is active in politics. This time he will contest the elections. Like Shiv Sena in Mumbai, this family dominates in Baramati.

Thackeray family of Mumbai (3 generations)
Balasaheb Thackeray: June 19, 1966 Raji Shiv Sena was established.
Son: Uddhav Thackeray unexpectedly became the Chief Minister of Maharashtra in 2019.
Grandson: Aditya Thackeray: President of Shiv Sena's Yuva Sena. In the Shiv Sena, the post of Daen is currently the Minister of Environment.  The order of 'Matoshri', the home of the Thackeray family, is considered final in Mumbai. No officer can live in this city without their approval.
Putanya: Raj Thackeray
: Lineage and contractual nature. Establishment of own party MNS after differences in Shiv Sena.
Gopinath Munde Gharane (2 generations)
Gopinath Munde: Veteran BJP leader. He was the Home Minister of Maharashtra. Became a minister at the Center. The eldest daughter Pankaja was a cabinet minister in Maharashtra. The second daughter, Pritam, is an MP from Beed.
Putanya Dhananjay Munde was first active in the BJP but later joined the NCP due to differences. He is the leader of the NCP Legislative Party in the Legislative Council. This family dominates Beed district.
🔹Eknath Khadse family (2 generations)
Eknath Khadse: Senior BJP leader, former minister. As the BJP started infiltrating, Eknath Khadse approached the NCP. Currently, Maharashtra Minister. Khadse's daughter-in-law Raksha Khadse is a sitting Lok Sabha MP from Raver.
Shankarrao Chavan Gharane (2 generations)
Shankarrao Chavan: Twice Chief Minister on behalf of Congress. First in 1975, then in 1986. At the center was the finance and home minister. His son Ashok Chavan has also remained the Chief Minister. Ashok's wife Amita remains an MLA. The Chavan family dominates Nanded district.
🔹 Shivajirao Patil Nilangekar (3 generations)
Shivajirao Nilangekar was the Chief Minister of Maharashtra in 1985-86. Veteran Congress leader. His son Dilip was an MLA. Soon Rupatai was an MP. Grandson Sambhaji was a minister in the BJP government in the state.
Vasantdada Patil Gharane (3 generations)
He was the Chief Minister from 1977 to 1978. In 1983, he was the CM again. You are reading the post of Information Service Group Pethwadgaon. Vasantdada's wife Shalinitai was a cabinet minister. She became an MP in 1980. Son Prakash was a Member of Parliament for Sangli before 2009. His nephew Madan Patil was a Member of Parliament and Minister. Grandfather's grandson Pratik was a Member of Parliament for Sangli in 2009.
Chhagan Bhujbal family (2 generations)
Chhagan Chandrakant Bhujbal: Impressed by Balasaheb Thackeray, he joined Shiv Sena. In 1985, he was the Mayor of Mumbai. He was known as a Shiv Sainik of hardcore bones. He joined the Congress in 1991 due to differences. Later he joined NCP. He remains the Deputy Chief Minister of Maharashtra. Son Pankaj remained MLA. Putanya Sameer was an MP in 2009. Bhujbal is currently a Minister.
🔹 Shankarrao Mohite Patil (3 generations)
Shankarrao Patil of Akluj, known as the Emperor of Sugar, was active from 1952 to 1972. He was MLA 4 times. His son Vijay Singh was a veteran leader of the NCP. He joined the BJP due to differences. He was also the Deputy Chief Minister of the state. His brother Pratap was a BJP MP. Vijay Singh's son Ranjit was a Rajya Sabha MP. Sohpur district is ruled by Mohite Patil family. It doesn't matter which party he belongs to.
Vikhe Patil Gharane (3 generations)
Balasaheb Vikhe Patil: Balasaheb Vikhe Patil won from Ahmednagar North seven times from Congress. He joined Shiv Sena and became a Minister at the Center. Son Radhakrishna was in Shiv Sena in Maharashtra for some time. He came back to Congress and was Leader of Opposition. Now he is in BJP. Radhakrishna's wife Shalini is from Ahmednagar district. W. Was president. Son Sujay is an MP from BJP. This family dominates the entire Nagar district.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.