Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १६, २०२१

जिजाऊ योजनेच्या फसव्या जाहिरातीपासून सावध रहा - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे

 जिजाऊ योजनेच्या फसव्या जाहिरातीपासून सावध रहा -   जिल्हा  महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे

चंद्रपूर, दि. 15 मार्च : दिनांक 1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, अशा घरातील प्रत्येक विधवा महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता / जिजाऊ या योजनेअंतर्गत रुपये 50 हजार लाभ मिळतील अशी खोटी माहिती सोशल मिडियावर पसरत असल्याचे निदर्शनात आले आहे. ही माहिती पुर्णत: खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित नाही. या संदेशामुळे नागरिकांची फसवणुक होण्याची शक्यता असून नागरिकांनी या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.