Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०२१

योग आणि ध्यान साधना अभ्यासक्रमाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या शुभहस्ते उद्घाटन




कामठी : मातोश्री अंजनाबाई बहुउद्देशीय महिला विकास मंडळ नागपूरद्वारे समाजकार्य महाविद्यालय कामठी, यशोदा गर्ल्स आर्ट अँड कॉमर्स कॉलेज नागपूर, एस.जी.बी.वुमन कॉलेज तुमसर, एन. जे. पटेल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मोहाडी, एस आर बी टी कॉमर्स कॉलेज मौदा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ऑनलाइन योग व ज्ञानसाधना अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मातोश्री अंजनाबाई मेश्राम यांच्या २६ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने एक महिना चालणाऱ्या योग आणि ध्यानसाधना ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे माननीय कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या शुभहस्ते नुकतेच झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम होते. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून डॉ. एम. एम. घारोटे, अध्यक्ष, योगा इन्स्टिट्यूट लोणावळा, पुणे , डॉ. पियुष जैन, राष्ट्रीय सचिव, फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया, इंजिनीयर संजय खोडे, इंटरनॅशनल योगा एक्सपर्ट एक्झामिनर, नागपूर,संस्थेचे अध्यक्षा डॉ. ललिता पुनैय्या, सचिव डॉ. वंदना मेश्राम, उपाध्यक्षा डॉ. राजश्री मेश्राम, डॉ.मनीषा हिरेखन यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
सर्वप्रथम मातोश्री अंजनाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.या प्रसंगी कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, डॉ. पूरणचंद्र मेश्राम या मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. एम. एम. घारोटे यांना योगशास्त्रात डी.लीट. प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. मनीषा हिरेखन लिखित 'बुद्ध निकायोका इतिहास', डॉ. वंदना मेश्राम लिखित 'व्हॅल्यू अँड इन्व्हरमेंट एज्युकेशन' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यानंतर डॉ. एम.एम. घारोटे यांनी सत्काराला उत्तर देताना योगाचे महत्त्व पटवून सांगितले व योगासंबंधी ज्या चुकीच्या धारणा आहेत त्या धारणा दूर करून आयुष्याच्या परंपरेतून उदयाला आलेल्या शुद्ध योगापद्धतीविषयी त्यांनी विस्तृत विवेचन केले. कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी मार्गदर्शन करताना म्हणाले, आजारापासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात योग आत्मसात करणे अनिवार्य आहे. योगामुळे मानव शारीरिक आणि मानसिक दोन्ही रोगांपासून मुक्त राहू शकतो तसेच माणसाला अधिक ऊर्जा प्राप्त होते मनाचे आणि शरीराचे संतुलन कायम ठेवण्यासाठी योग आणि ध्यान साधना अत्यंत अपरिहार्य आहे.योग आणि ध्यान साधनेमुळे मनुष्याला प्रेरणादायी आंतरिक ऊर्जा प्राप्त होते, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी मातोश्री अंजनाबाई मेश्राम यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी आईची महिमा वर्णित केली आणि योग व ध्यान साधनेचे महत्व पटवून सांगितले. यानिमित्त डॉ. पियुष जैन, योगतज्ज्ञ संजय खोडे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले.

संचालन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. ललिता पुन्नय्या यांनी केले प्रास्तविक सचिव डॉ. वंदना इंगळे यांनी केले तर डॉ. सुभाष दाढे यांनी मानले. सिद्धांत मेश्राम, रचित मेश्राम, वैदेही इंगळे यांनी कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. . प्रस्तुत सोहळ्याला मोठ्या संख्येने प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.