विहिंप महिला विभाग तर्फे कारसेविकांचा सत्कार तसेच रामरक्षा पठण चे आयोजन संपन्न
नागपूर, दिनांक १२ फेब्रुवारी.
अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी वर मंदिर निर्माण साठी सुरु असलेल्या निधी समर्पण गृहसंपर्क अभियान अंतर्गत राम भक्त महिलांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण तसेच महिला कारसेविकांचा सत्काराचे आयोजन श्री सिद्ध गणेश मंदिर, बुटी ले आउट, लक्ष्मी नगर येथे करण्यात आले होते. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्रताई जोशी यांनी मनोगत व्यक्त करतांना अयोध्येतील कारसेवेचे समर्पक चित्रण उभे केले, जुन्या कार्यकर्त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या प्रसंगी सुगंधाताई जगदाळे ,सुमन खणवाले, वैशाली भांगे, सुलभाताई चांदे, स्वाती साठे,लताताई देशपांडे, मालिनी जोशी, श्रीमती देशकर, प्रीती देशपांडे या महिला कारसेविकांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला उपस्थित कारसेविकांचे अभिनंदन केले. तसेच धनाढ्य देणगीदारां पासून हातावर पोट असलेल्या मजूर कुटुंबाच्या रामभक्तीचा उल्लेख आपल्या भाषणात केला. व्यासपीठावर विदर्भ प्रांत अभियान प्रमुख गोविंद शेंडे, विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांत उपाध्यक्षा ममता चिंचवडकर, लक्ष्मी नगर कार्यवाह विजय भागडीकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात सामुहिक रामरक्षा तसेच रामधून ने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता चिंचवडकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाताई व्याघ्र यांनी केले, निधी समर्पण अभियानाचे गीत शुभदा देवगडे यांनी गायले. अंजली वैद्लीयार यांनी आभार प्रदर्शन केले. विश्व हिंदू परिषद नागपूर महानगर महिला प्रमुख अंजली वैद्य व कल्पना गडवे यांचे आयोजनात सहकार्य लाभले , आरती व तिळगुळ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.