नागपूर:
राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस कोरोनाचे अधिक संख्येने रुग्ण मिळू लागलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाविकांना आता इथून पुढचे काही दिवस दर्शन घेता येणार नाही. यवतमाळ, अकोला, नागपूर या भागांत कोरोनाचे अधिक रुग्ण मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भ प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आहे. गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्याचमुळे इथून पुढचे काही दिवस गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येईल