सावरटोला येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.20 फेब्रुवारी:-
सावरटोला (नवेगाव बांध) ता. मोरगावअर्जुनी येथे दि.19 फेब्रुवारी रोज शुक्रवारी शिवजन्मोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील प्रथम नागरिक युवराज तरोणे , मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे, विश्वजीत बागडे, ग्रामपंचायत सदस्य तथा गणमान्य नागरिक उपस्थित होते.
सावरटोला येथील स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य प्राप्त आणि नोकरीवर रुजू झालेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी-बारावी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.
आजच्या काळात शिवबाच्या विचाराची तरुणाईला गरज आहे .शिवबाच्या चरित्रा पासून आपण आदर्श घ्यावा, समाजासाठी, देशासाठी निष्ठावान होऊन कार्य करत रहावे आणि अंधश्रद्धा तसेच व्यसनापासून दूर रहावे.याप्रसंगी शिवरायांच्या जीवनावर त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकताना हे राज्य व्हावे हे रयतेची इच्छा हे त्यांनी मावळ्यांच्या मनावर बिंबवलं म्हणून जीवाला जीव देणारे निष्ठावान मावळे निर्माण झाले.लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे ही भावना रयतेच्या मनात निर्माण झाली. प्रत्येक व्यक्तीला हे राज्य आपले असे आहे असे वाटायचे. याचे कारण शिवाजीची कार्यकुशलता आणि अजोड नेतृत्व क्षमता होती. शिवाजी महाराज शत्रू शत्रू सारखे आणि मित्रांशी मित्रांसारखे वागले मित्रांच्या पाठीत खंजर खूपसली नाही.महत्त्वाच्या जागेवर जीवाला जीव देणारे मुस्लिम बांधव होते. शिवाजी महाराज म्हणजे सर्वधर्म समभावाचे मूर्तिमंत प्रतीक. असे प्रतिपादन यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले.
निष्कलंक चारित्र्य असलेला राजा शिवराय. औरंगजेब दस्तूरखुद्द म्हणतो-" शिवराय इतर स्त्रीयांशी कसा बोलायचा जसा तो आपल्या आयाबहिणी शी बोलायचा". आमच्या राजाच्या स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची पावती औरंगजेबाने सुद्धा दिली आहे. चारित्र्यसंपन्न राज्याच्या चारित्र्याची पावती दुश्मनाने द्यावी या पेक्षा मोठेपण कोणतं? शाहिस्तेखान म्हणतो" दुश्मन शिवा किसी की उंगली काट सकता है.. किसी की गर्दन काट सकता है लेकिन किसी के मा बहन के तरफ नजर उठा के भी देख नही सकता! औरत जात की बहोत इज्जत करनेवाला राजा है! असे ऐतिहासिक दाखले आपल्या भाषणातून सुनील तरोणे यांनी शिवाजी महाराज यांचा आदर्श युवकांनी घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला सावरटोला ग्रामवाशी महिला, पुरुष,आबाल वृद्ध बहुसंख्येणे उपस्थित होते.