Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, मार्च १६, २०२२
मंगळवार, सप्टेंबर ०७, २०२१
वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांना सुवर्णपदक |
एलाइट मेन्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीप
वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांना सुवर्णपदक
मुंबई : बुलडाणा येथे दि. ३ ते ७ सप्टेंबर २०२१ या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरावरील पुरुषांसाठीच्या ९० व्या एलाइट मेन्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये (Elite Men's Maharashtra State Boxing Championship) वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथील वीर सावरकर बॉक्सिंग क्लबमधील मुष्टियोद्धे हे मुंबई जिल्हा मुष्टियोद्ध्यांच्या चमूचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या स्पर्धेसाठी गेलेल्या चमूमधील या दोघांनी सुवर्णपदक मिळवले असून आता एलाइट मेन्स नॅशनल बॉक्सिंग चँपियनशीपसाठी कर्नाटकातील बेल्लारी येथे ते जातील. बेल्लारी येथे येत्या १५ ते २२ सप्टेंबर २०२१ या दरम्यान ही मुष्टियुद्ध स्पर्धा होणार आहे.
Elite Men's Maharashtra State Boxing Championship
सोमवार, फेब्रुवारी २२, २०२१
शेगावचे गजानन महाराज मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद
नागपूर:
मंगळवार, डिसेंबर १८, २०१८
पाणी टंचाई दूर करा; नांदुरा नगर पालिकेवर मोर्चा धडकला !
नांदुरा: प्रतिनिधी
शहरातील भिमनगर, रामनगर परीसरातील पिण्याचे पाण्याची टंचाई दुर करणे व विकास कामांचे मागणीसाठी मंगळवार दि.१८ डिसेंबर रोजी भारीप बहुजन महासंघ युवा आघाडिचे वतीने नांदुरा नगर पालिका कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.
नियोजीत आयोजनानुसार दुपारी १२ वाजता भिमनगर,रामनगर परीसरातुन प्रारंभ करण्यात आलेला होता. सदर मोर्चा नांदुरा शहराचे प्रमुख मार्गावरून जातांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते.सदर मोर्चात पाणी टंचाई व परीसरातील ईतर नागरी समस्यांनी त्रस्त झालेले सर्वधर्मिय नागरीक व महिला स्वयंम स्फुर्तीने मोठ्या संख्येत सहभागी झालेले दिसुन आले.
सदर मोर्चा नांदुरा नगरपालीका कार्यालयावर पोहोचला असता तेथे सुरक्षेचे दृष्ट्रिने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मोर्चातील बहुसंख्य मोर्चेकर्यांचे गर्दीमुळे राष्ट्रिय महामार्गावरील वाहतुक विस्कळित होऊ नये म्हणुन सर्व मोर्चेकर्यांना नगर पालिकेच्या आवारात प्रवेश देण्यात आला होता.
नांदुरा नगर पालिकेच्या आवारात मोर्चेकर्यांनी प्रवेश करताच ,,पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे !,,या घोषणांची न.प.आवार दणाणुन गेलेले दिसत होते. अशातच संतप्त झालेल्या महिलांनी आपल्या सोबत आणलेल्या मातीच्या घागरी व माठ फोडुन नांदुरा नगर पालिका प्रशासनाचा निषेध केला.
रामनगर व भिमनगर परीसरातील प्रमुख नागरीक व महिलांचे शिष्ठमंडळाने पोलीस बंदोबस्तात मुख्याधिकारी डोके साहेब यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. चर्चा केली असता मुख्याधिकार्यांनी पाण्याची व ईतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मोर्चातील नागरीकांच्या मागण्या ऐकुन त्या कशा सोडविता येतील याबाबत न.प. पदाधिकारी व नगरसेवक गैरहजर होते हे विषेश !
धडक मोर्चा यशस्वी करण्यासाठी धम्मपाल वाकोडे,वैभव मनवुर,राजाभाऊ वाकोडे,गणेश वानखडे,राजरत्न तायडे, शैलेश वाकोडे, अर्जुन वानखडे,अरूण वाकोडे, अनिसभाई ठेकेदार, रशीदभाई, शालुबाई वाकोडे, बासोडे ताई, छायाबाई आमले यांचेसह अनेक मान्यवरानी परीश्रम घेतले होते.