श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये करिअर गाईडन्स् सेंटरचे उद्घघाटन समारंभ संपन्न
जुन्नर /वार्ताहर
श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील ज्युनिअर कॉलेज मधील कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विशेषता बारावी नंतर करिअर संधीसाठी मार्गदर्शन करण्याकरिता " करिअर गाईडन्स् सेटरचे उद्धघाटन समारंभ जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री विकास जाधव साहेब यांच्या हस्ते पार पडले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविघालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत मंडलिक हे होते . याप्रसंगी माननीय अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी , उपप्राचार्य प्रा .लोढा मँडम पर्यवेक्षक प्रा . श्रीमंते सर , तसेच जुन्नर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक निलेश बडाख ' सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे ' पोलिस उपनिरिक्षक युवराज पाटील ' व पोलिस उपनिरिक्षक स्मिता नवघरे मॅडम व पोलिस कर्मचारी जोरी व करिअर गाईडन्स सेंटरचे विभाग प्रमुख प्रा शरद मनसुख ' व कलाशाखेतील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते .
या करिअर गाईडन्स् सेंटरचे उद्धघाटन प्रसंगी पोलिस निरिक्षक विकास जाधव साहेब यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करून येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परिक्षा तसेच पोलिस व मिलिटरी भरती ' आरोग्य सेवा ' पोस्टसेवा ' स्टाफ सिलेक्शन भरती आणि जिल्हा परिषद व महानगरपालिका मधील सरळसेवा भरतीसाठी या करिअर गाईडन्स् सेंटरचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून या सुवर्णसंधीचा लाभ विद्यार्थ्यांनी आवश्य घ्यावा व आपले करिअर घडवावे असे सांगितले .
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ चंद्रकांत मंडलिक यांनी आपल्या मनोगतात " ग्रामीण व आदिवासी भागातील' गोरंगरिब व होतकरू विद्यार्थ्याना वेगवेगळ्या स्पर्धापरिक्षामध्ये चांगले व उत्तम करिअरसाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून महाविघालयाने हे करिअर गाईडन्स सेंटर सुरु केले आहे . आमच्या महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी स्पर्धा परिक्षेद्वारे डीवाय .एस .पी तसेच पोलिस निरिक्षक व विविध स्पर्धा परिक्षा अंतर्गत उत्तुंग यश संपादन केले आहे . आणि हाच वारसा पुढे नेऊन विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे नाव निश्चित उज्वल करतील हा विश्वास आहे .
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक प्रा . समीर श्रीमंते सर व पाहुण्यांचा परिचय प्रा . शरद मनसुख सर तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा . निलेशआमले सर व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . मीरा हाडवळे यांनी केले .