अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आंबा दुमाला गावच्या सरपंचांनी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेत पदाचा कार्यभार स्वीकारला. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता.
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. सरपंचाचे हेलीकॉप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलाच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गावातील उद्योजक तरूण जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालींदर गागरे यांना सांगितले.