Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १७, २०२१

थकीत पगारामुळे अनाथ झाले अनिकेत व मोनिका


संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने व अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा...



शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील कामगारांचे वेतन वारंवार थकीत राहिल्यामुळे एप्रिल २०२० मध्ये प्रदीप खडसे तसेच ऑगस्ट २०२० मध्ये संगीता पाटील या कामगारांचा तणावामुळे मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला असा जनविकास कामगार संघाचा आरोप आहे.

 संगीता पाटील यांच्या पतीचे सुद्धा ६ महिन्यांपूर्वी निधन झाले होते.त्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा 'अनिकेत' अनाथ झाला. वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत प्रदीप खडसे यांची २२ वर्षीय मुलगी मोनिका व वय 19 वर्षीय मुलगा प्रणल यांचे वडिलांचे छत्र हरपले. विशेष म्हणजे या कामगारांच्या मृत्यूला आठ ते दहा महिने होऊनही त्यांच्या मृत्यूपुर्वीचे थकित पगार बँक खात्यामध्ये अजून पावेतो जमा झालेले नाही.

अनिकेत व मोनिका यांनी आज डेरा आंदोलनामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून आंदोलनाला समर्थन दिले. यावेळी माध्यमांना मुलांनी दिलेली प्रतिक्रिया मनाला चटका लावून जाणारी होती.थकित पगारामुळे आमच्या घरच्या कर्त्या व्यक्तीचा जीव गेला.ही वेळ इतर तर कोणावर येऊ नये म्हणून डेरा आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषण करित आहोत,अशी भावना या दोन्ही मुलांनी व्यक्त केली.

तसेच दोन कामगारांचे स्वभाविक मृत्यू नसून भ्रष्ट अधिकार्‍यांनी केलेल्या हत्या आहेत असा आरोप करून त्यांच्या मुलांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. तात्यासाहेब लहाने तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली.वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ तात्यासाहेब लहाने तसेच वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.एस. एस.मोरे यांनी स्वमर्जीतील कंत्राटदाराचे हित जपण्यासाठी भ्रष्टाचार केल्यामुळे कामगारांचे वेतन थकित असल्याचा सुद्धा कामगारांचा आरोप आहे.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चा डेरा आंदोलनाला सक्रिय पाठिंबा
आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटा)चे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पाथाडे यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळांने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना लेखी पत्र दिले व डेरा आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला.या शिष्टमंडळा मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे यांचेसह जिल्हा महासचिव प्रकाश कांबळे ,जिल्हा सचिव राजू भगत ,राजुरा तालुका अध्यक्ष ईश्वर देवगडे , बल्लारपूर तालुका अध्यक्ष धर्मेश नागदेवते व शहराध्यक्ष प्रवीण डोर्लीकर , बाळू आंबेकर, सुमेध मुरमाडकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ नेते के.के. सिंह यांचे नेतृत्वात उद्या इंटकचे धरणे व युवक-युवतींचा मोर्चा

कोविड योद्ध्यांच्या डेरा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी इंटकचे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मधील ज्येष्ठ नेते के.के.सिंह यांच्या नेतृत्वात वेकोलिच्या चंद्रपूर, बल्लारपूर व माजरी क्षेत्रातील इंटक(राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाचे) चे पदाधिकारी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डेरा आंदोलनाच्या मंडपात धरणे देणार आहेत.तसेच डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ युवकांची एक रॅली उद्या दुपारी बारा वाजता जटपुरा गेट येथून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर पर्यंत आयोजीत करण्यात आलेली आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.