चंद्रपूर क्लीन एअर ऍक्शन ग्रुप (C-CAAG-सी-कॅग) च्या समन्वयाची भूमिका प्रा. सुरेश चोपणे,(अध्यक्ष- ग्रीन प्लानेट सोसायटी) प्रा. योगेश दुधपचारे (जीपीएस) व बंडू धोत्रे (इकोप्रो) यांनी घेतली. चर्चे दरम्यान वाढते हवाप्रदूषण दृश्य स्वरूपात दाखवण्यासाठी शहरामध्ये कृत्रिम फुफुसांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृत्रिम फुफुसांची स्थापना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल.
शहरामधील हवा प्रदूषणाचे नेमके प्रमाण कळण्यासाठी शहरात हवा मापन यंत्राद्वारे हवेच्या गुणवत्तेचे मापन करण्यात येईल. या मॉनिटरिंग मधून हाती आलेल्या आकडेवारीचा विश्लेषण करून संशोधन अहवाल तयार करून तो संबंधित स्थानिक लोक प्रतिनिधी, महापालिका तसेच पर्यावरण मंत्र्यांना पाठवला जाईल.
औष्णिक विद्युत/ऊर्जा प्रकल्पाद्वारे हवा प्रदूषणाच्या मांकांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्या विरोधात नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण पुणे येथील नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल आणि त्यानंतर दिल्लीतील एनजीटीच्या प्रधान पीठाकडे वर्ग करण्यात आले. मार्च २०२१ मध्ये या प्रकरणावर सुनावणी होणार असून या प्रकरणाशी बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे ठरवण्यात आले.
डोमेस्टिक कोल बर्निंग, थर्मल पॉवर प्रदूषण,हवा प्रदूषणाचे दुष्परिणामा संदर्भात विविध जनजागृती मोहीम राबविण्यात येईल.त्यासाठी,सायकल चा वापर,पब्लिक ट्रान्सपोर्ट, इ ला चालना देऊन उद्योगांना आणि प्रशासनाला प्रदूषण नियंत्रण यंत्रणा लावण्यास बाध्य केले जाईल
ह्या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई च्या वातावरण फौंडेशनच्या माध्यमातून झाले .दिल्लीच्या पर्यावरण संस्थेचे सुनील दहिया ,मुंबई च्या वातावरण संस्थेचे भगवान केशभट,आणि ग्रीन प्लानेट संस्थेचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यानी पॉवर पॉईंट द्वारे देशातील आणि चंद्रपूर मधील प्रदूषणाचा आढावा घेऊन उपाययोजना सुचविल्या.
कार्यक्रमात प्रामुख्याने वातावरण संस्थेचे राहुल सावंत,श्री रामगावकर, असर संस्थेचे बद्री चॅटर्जी, आरे कोलिनी मुंबई च्या आंदोलक कु राधिका जव्हेरी ,इको अध्यक्ष बंडू धोत्रे,ग्रीन प्लानेट सोसायटीचे प्रा योगेश दुधपचारे, प्रा सचिन वझलवार, विविध संस्थानचे प्रमुख- श्रमिक एल्गार च्या पारोमिता गोस्वामी,श्याम धोपटे, डॉ गोपाल मुंधडा, प्रा विनोद गोरंटीवार,प्रा सचिन वझलवार,प्रवीण जोगी ,महेंद्र राळे,प्रा महेंद्र ठाकरे,प्रा नामदेव कंनाके,डॉ अभिलाषा गावतुरे,भाविक येरगुडे,किशोर जामदार,नितीन मत्ते,कु गारगेलवार,दिनेश खाटे,मझहर अली,सौ आदलाबादकर मॅडम,नितीन रामटेके,इ अनेकांनि सहभाग घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी आपली मते मांडली