Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १७, २०२१

मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा भोयर



सावली- तालुक्यातील मेहा बुजरूक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा खूमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. १५ जानेवारी रोजी मेहा बुजरुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यात शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे सातही उमेदवार विजयी झाले होते. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी राखीव निघाले. मात्र, मात्र, या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंच पद सुधारित आरक्षण येईपर्यंत पुढील काही महिन्यासाठी रिक्त राहणार आहे. आज दि. १७ फेब्रुवारी रोजी उपसरपंच पदासाठी निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून पंचायत समितीचे बंडू मुरकुटे आणि ग्रामसेवक अनिल टेकाम यांची उपस्थिती होती. यावेळी उपसरपंचपदी शारदा खूमाजी भोयर यांची एकमताने निवड झाली. ग्रामपंचायत सदस्यात वॉर्ड क्रमांक १ मधून किरण महादेव ठाकरे, भावना योगेश चिमुरकर, वॉर्ड क्रमांक 2 मधून चिमणदास गिरीधर निकुरे, शीतल सुनील ठाकरे, वॉर्ड क्रमांक ३ मधून रुपेश गणपत रामटेके, पंकज गजानन दलांजे यांचा समावेश आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.